Join us  

ज्यांच्यासाठी एका कॉलवर मी धावत जायचे, आज त्याच.....कंगणाने बॉलिवूड अभिनेत्रींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 5:12 PM

Kangana Ranaut Said Bollywood never treated her right on her myriad social media posts: आजपर्यंत कोणत्याच बॉलिवूडच्या अभिनत्रींना कंगणाला पाठिंबा दर्शवला नाही.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कंगणाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांमध्ये कंगणा विविध गोष्टींमध्ये स्वतःहून वाद ओढावून घेते त्यामुळे तिच्या सिनेमांपेक्षा तिने केलेल्या रोख ठोक व्यक्तव्यांवरच जास्त चर्चा रंगते. अनेकदा ती बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून अनेक सेलिब्रेटींवर निशाणा साधताना दिसते.

 

आजपर्यंत असा एकही मुद्दा कंगणाने सोडलेला नाही ज्यावर तिने आपले मत मांडले नसेल. वाद आणि कंगणा असेच समीकरण सध्या बनत चाललंय.पुन्हा एकदा कंगणाने जुन्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत. यावरही तिने आपले विचार मांडले आहेत.आजपर्यंत कोणत्याच बॉलिवूडच्या अभिनत्रींना  कंगणाला पाठिंबा दर्शवला नाही. 

या त्याच आहेत. ज्यांच्यासाठी मी एका कॉलवर धावत जायचे. त्यांच्या सिनेमांचे प्रिमिअरसाठी स्वतःहून मला कॉल करत आवर्जुन बोलवायचे. पुष्पगुच्छ घरी पाठवायचे आणि आज या त्याच आहेत ज्या साध्या मला सपोर्टही करत नाहीत. सपोर्ट करणे तर सोडाच यांनी माझ्या विरोधात षडयंत्रच रचले आहे. एक ग्रुप बनला आहेत. ठरवूनच कोणी माझ्या समर्थनार्थ बोलत नाहीत. एरव्ही सगळ्यांना सपोर्ट करतात. मात्र या माझ्या मैत्रिणी आज माझा साधा फोनही उचलत नाहीत. मी माझ्या सिनेमांच्या प्रिमिअरला बोलावते तर तिथेही येत नाहीत. 

 

कंगना तू धाडसी, निर्भय आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे, जुही चावलाचे ट्विट व्हायरल

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकवला आहे. कंगानवर अभिनंदनाचा वर्षाव करतोय. बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलानेही सोशल मीडियावर कंगनाचे अभिनंदन केले. जूही चावलाने तिच्या ट्विटर अकाउंटवर कंगना रनौतच्या 34 वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक पोस्ट शेअर केली, 'कंगना तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. निडर, आणि प्रतिभाशाली मुलीचे खूप खूप अभिनंदन !!! आपण अमर्याद सर्जनशीलता क्षमता सकारात्मक दिशेने वापर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा '. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.लवकरच 'थलायवी' चित्रपटातून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतजुही चावला