Join us  

कंगना राणौतचा ‘यु-टर्न’! अचानक सलमान खान झाला मित्र!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 6:00 AM

अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची.

ठळक मुद्दे काळासोबत अनेकजण नमतात. किंबहुना काळासमोर नमावेचं लागते. कंगनाही याला अपवाद नाही, असेच म्हणावे लागले. कारण असे नसते तर कंगना नरमली नसली. तिने अचानक असा यु टर्न घेतला नसता.

अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’  सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची. ‘कॉफी विद करण’च्या मागच्या सीझनमध्ये तर कंगना  बॉलिवूडच्या ‘खान’ तिकडीवर चांगलीच भडकली होती. सलमान खान, शाहरूख खान व आमिर खान यांच्यासोबत काम करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. सुरूवातीच्या काळात तिन्ही खानांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. आता त्यांच्यासोबत काम करणे हा मूर्खपणा असेल, असे कंगना म्हणाली होती. पण काळासोबत अनेकजण नमतात. किंबहुना काळासमोर नमावेचं लागते. कंगनाही याला अपवाद नाही, असेच म्हणावे लागले. कारण असे नसते तर कंगना नरमली नसली. तिने अचानक असा यु टर्न घेतला नसता.

होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटमध्ये कंगनाला सलमान खानसोबत काम करण्याबद्दल विचारण्यात आले. सलमानसोबत भविष्यात काम करशील का? असा प्रश्न तिला केला गेला. यावर कंगना पुन्हा बिथरणार, असे वाटत असताना कंगनाने अचानक यु टर्न घेतला.  सलमान माझा मित्र आहे. त्याच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडले. सलमानसोबत कलाकार म्हणून वा दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मला नक्कीच आनंद होईल, असे कंगना म्हणाली.

कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होतोय. याआधीचे तिचे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका’ हिट होणे कंगनासाठी गरजेचे आहे. पण त्याआधी कंगना बरीच नरमली आहे. बॉलिवूडमधील अनेकांशी बिघडलेले संबंध सुधारण्यावर तिचा जोर दिसतोय.

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीसलमान खान