Join us  

Koo अ‍ॅपवर कंगनाची धाकड एन्ट्री, पहिल्या पोस्टमध्ये ट्विटरला म्हटले भाड्याचे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:46 PM

 गेल्या काही महिन्यांत तर कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती.

ठळक मुद्देही ट्विटरसारखीच एक अ‍ॅप आहे. 10 महिन्यांपूर्वीच हे अ‍ॅप लॉन्च झाले. या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे.

ट्विटरवर सतत या ना त्या मुद्यावर टिवटिव करणारी कंगना राणौतने अखेर Koo  या इंडियन मायक्रो ब्लॉगिंग अ‍ॅपवर धाकड एन्ट्री घेतलीय. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.कू अ‍ॅपवरील आपल्या बायोमध्ये कंगनाने स्वत:ला खरी देशभक्त व गरम रक्ताची क्षत्रिय स्त्री म्हटले आहे. या अ‍ॅपवरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये कंगनाने ट्विटररला भाड्याचे घर म्हटले आहे.

कू वरची पहिली पोस्ट...

‘सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते...,’ असे कंगनाने लिहिले आहे.कू अ‍ॅप ज्वाईन करताच कंगनाच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसतेय. कंगनाला या अ‍ॅपवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा फॉलो करत आहेत. गेल्या काही महिन्यांत तर कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती.  सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना तर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते.  महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले. काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या बेताल ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला विरोध करत कंगनाने ट्विटचा भडीमार केला होता. थेट आंदोलनकर्त्या शेतक-यांना दहशतवादी म्हटले होते. यानंतर ट्विटरने कारवाई करत तिचे काही वादग्रस्त ट्विट डिलीट केले होते. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण ट्विटरने दिले होते.

काय आहे Koo ?

ही ट्विटरसारखीच एक अ‍ॅप आहे. 10 महिन्यांपूर्वीच हे अ‍ॅप लॉन्च झाले. या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे. हेअ‍ॅप Aprameya Radhakrishna आणि  Mayank Bidwatka  यांनी विकसीत केली आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी अशा अनेक भाषेत ही अ‍ॅपलॉन्च करण्यात आली आहे. गुगल प्लेस्टोरवर या अ‍ॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ म्हटले गेले आहे. कनेक्ट विद इंडियन्स इन इंडियन लँग्वेज, अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे. 

टॅग्स :कंगना राणौत