Join us  

सिद्ध करा, मी ट्विटर सोडेन...! कंगना राणौतचे खुले आव्हान

By रूपाली मुधोळकर | Published: September 21, 2020 6:45 PM

शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप होताच चवताळली बॉलिवूडची ‘क्वीन’

ठळक मुद्देकंगनाने शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप होताच कंगना चवताळली. 

सध्या देशभर कृषी विधेयकावर चर्चा सुरु आहे. अनेक लोक या विधेयकाला विरोध करत आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणौतने असे काही ट्विट केले की, अचानक ती वादात सापडली. या ट्विटमध्ये कंगनाने शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसने केला. मग काय, कंगनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रिया पाहून पाहून शांत बसेन ती कंगना कुठली? या प्रतिक्रियांना उत्तर देताना तिने थेट ट्विटर सोडण्याचा इशारा दिला. मी शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचे कोणी सिद्ध केल्यास मी माफी मागून ट्विटर कायमचे सोडून देईन, असे कंगना म्हणाली.

कंगनाचे ते ट्विट...कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शेतक-यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही दिली. कंगनाने मोदींचे हे ट्विट रिट्विट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘मोदीजी, कोणी झोपले असेल तर त्याला जागे केले जाऊ शकेल, पण झोपेचे सोंग घेणा-यांना कोण जागे करेन. अशा लोकांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार. हे तेच दहशतवादी आहेत़, ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएएमुळे एकाही व्यक्तिचे नागरिकत्व गेले नाही, मात्र त्यांनी सीएएविरूद् आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते,’ असे कंगनाने लिहिले. तिच्या या ट्विटवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. आता कंगना शेतक-यांना दहशतवादी म्हणतेय. मोदी सरकारने दिलेली सुरक्षा व पाठींबामुळे भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली आहे, असे सचिन सावंत म्हणाले होते.

सिद्ध कराच...कंगनाने शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप होताच कंगना चवताळली. मग तिने ट्विटवर हा आरोप करणा-यांना थेट आव्हान दिले.‘जैसे श्री कृष्ण की नारायणी सेना थी, वैसे ही पप्पु की भी अपनी एक चंपू सेना है जो की सिर्फ़ अफवाहों के दम पे लड़ना जानती है, यह है मेरा अरिजिनल ट्वीट अगर कोई यह सिद्ध करदे की मैंने किसानों को आतंकी कहा, मैं माफी माँगकर हमेशा केलिए ट्वीटर छोड़ दूँगी ’, असे थेट आव्हान तिने दिले.

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

टॅग्स :कंगना राणौत