Join us  

‘सोनियाजी, तुम्हीही एक महिला आहात...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगनाचं खुलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 1:13 PM

Kangana Ranaut Files FIR After Getting Death Threats : वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर कंगनाने एफआयआर दाखल केला आहे.

वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर कंगनाने एफआयआर दाखल केला आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर याची माहिती दिली. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील स्वत:चे काही फोटो शेअर करत तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. याच पोस्टमध्ये तिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विनंती केली आहे. तुम्हीही एक महिला आहोत. तुमच्या सासूबाई आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अखेरच्या क्षणापर्यंत दहशतवाद्यांविरोधात लढल्या. कृपया, तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याचे निर्देश द्या, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ती लिहिते, ‘मुंबई  दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करून मी लिहिलं होतं की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. अशा घटनांमध्ये देशांतर्गत गद्दारांचा हात असतो. कधी पैशाच्या लालसेने तर कधी पदाच्या लालसेपोटी भारतमातेला कलंकित करण्याची एकही संधी देशद्रोही सोडत नाहीत. माझ्या या पोस्टनंतर मला वारंवार धमक्या मिळत आहेत. पंजाबातील एका व्यक्तीने तर मला उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अर्थात मी अशा धमक्यांना घाबरत नाही. देशाविरोधात कट रचणाºयांविरोधात मी बोलतेय आणि बोलत राहणार. नक्षलवादी, दहशतवादी किंवा पंजाबला खलिस्तान बनवण्याचं स्वप्न पाहणाºयांविरोधात मी बोलणारच.  लोकशाही ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो अखंडता, एकात्मता आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि विचारांचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने आपल्याला दिला आहे. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही बोलले नाही. मी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी यांना विनंती करू  इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात. तुमच्या सासूबाई इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवादाविरुद्ध जोरदार लढा दिला. कृपया तुम्ही तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाºया धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना द्यावी. पंजाबमध्ये निवडणुका होत आहेत, त्यासाठी काही लोक संदर्भाशिवाय माझे शब्द वापरत आहेत. भविष्यात मला काही झालं तर त्याला केवळ द्वेषाचं  राजकारण करणारेच जबाबदार असतील. त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणाविरुद्ध द्वेष पसरवू नये...

टॅग्स :कंगना राणौतसोनिया गांधी