Join us  

कंगना म्हणाली, मी कार्यालयाची दुरूस्ती करणार नाही...; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:28 AM

कंगनाचा केला निर्धार, म्हणाली उद्ध्वस्तच....

ठळक मुद्दे कंगना शिवसेनेवर तोफ डागत असताना शिवसेनेने मात्र हा विषय आमच्यासाठी संपल्याचे म्हटले आहे.

सध्या देशभर फक्त आणि फक्त कंगना राणौत या नावाची चर्चा आहे. शिवसेनेशी पंगा घेणा-या कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयाचा काही भागावर मुंबई पालिकेने हातोडा चालवला आणि कंगना संतापली. इतकी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, तिने त्यांच्यावर तोफ डागली. यानंतरही कंगनाचे ठाकरे सरकारविरोधातील ट्विटरयुद्ध सुरुच आहे. काल कंगनाने तिच्या उध्वस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर एक ट्विट केले. मी या उध्वस्त झालेल्या कार्यालयात अशाच परिस्थितीत काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभे राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल, असे कंगना या ट्विटमध्ये म्हणाली.कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचे कौतुक केले आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटलं आहे.

म्हणे माझ्याकडे पैसे नाहीत...

15 जानेवारीला मी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर कोरोनाच्या महामारीने सगळे काही ठप्प झाले़ अनेकांप्रमाणे या दिवसात माझ्याकडेही काम नव्हत. त्यामुळे सध्या या कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी अशाच परिस्थितीत येथे काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभ राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल,’ असे कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली.

अन् कंगना बांधकाम पाडलेल्या ऑफिसात पोहाचली...

मुंबई महापालिकेने बुल्डोझर चालवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना काल आपल्या ऑफिसची अवस्था पाहायला गेली. पालिकेने कारवाई केली त्यावेळी कंगना मुंबईत नव्हती. ती मुंबईत येण्याआधीच मुंबई पालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई करायला सुरुवात केली होती. या कारवाईत कंगनाच्या ऑफिसमधील काही वस्तू आणि पेटिग्सची तोडफोड झाली आहे. आपल्या ऑफिसची ही अवस्था पाहून कंगना निराश झाली. तिच्या चेह-यावरचे हे निराशेचे भाव दाखवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झाले होते. याची किंमत 48 कोटींपेक्षाही जास्त आहे.

कंगना राणौत हा विषय आमच्यासाठी संपला...कंगना शिवसेनेवर तोफ डागत असताना शिवसेनेने मात्र हा विषय आमच्यासाठी संपल्याचे म्हटले आहे. आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला आहे. आमच्याकडे आणखीही अनेक कामे आहेत, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  खासदार संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हा वाद आमच्यादृष्टीने संपल्याचे म्हटले. आमच्यासाठी हा वाद संपुष्टात आला आहे. आम्ही आमच्या दैनिक सरकारी आणि सामाजिक कामात मग्न झालो आहोत, असे राऊत म्हणाले.

संतापजनक! कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत

In Pics: ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतकडे आहे 100 कोटींची संपत्ती, जाणून घ्या वर्षाची कमाई

टॅग्स :कंगना राणौत