Join us  

आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम

By रूपाली मुधोळकर | Published: November 19, 2020 1:18 PM

कंगना राणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत केले ट्विट

ठळक मुद्देडी. रूपा या कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते.

कर्नाटकच्या प्रमुख सचिव आयपीएस डी. रूपा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ट्विटरवर #ShameOnYouIPSRoopa ट्रेंड होतोय.  नेटकरी डी. रूपा यांना ट्रोल करत आहेत. अशात अभिनेत्री कंगना राणौत हिनेही रूपा यांना लक्ष्य केले आहे. आता हे नेमके काय प्रकरण ते जाणून घेऊ या.तर ट्विटरवर डी रूपा आणि True Indology यांच्यात फटाक्यावरील बंदीवरून जुंपली होती.  True Indology हे पेज हिंदू संस्कृतीबद्दल माहिती देते. मात्र रूपा यांनी या पेजवर लोकांना भ्रमित करण्याचा आरोप केला होता. यानंतर ट्विटरने True Indology अकाऊंट सन्पेंड केले होते. True Indology चे अकाऊंट ट्विटरने सस्पेंड करताच लोक भडकले होते. डी. रूपा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. रूपा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. आता कंगना राणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे.

काय म्हणाली कंगना?

डी. रूपा आणि True Indology यांच्या वादात कंगनाने उडी घेत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने डी. रूपा यांना निलंबित करण्याची मागणी केली. ‘आरक्षणाचे दुष्परिणाम. अपात्र व्यक्तिला पॉवर मिळतो, तेव्हा ती व्यक्ति जखमा भरत नाही तर त्या जखमांवरची खिपली काढण्याचे काम करते. मला त्यांच्या (डी. रूपा) खासगी आयुष्याबद्दल काहीही माहित नाही. पण मी गॅरंटीसह म्हणते की, त्यांचे नैराश्य त्यांच्या अकार्यक्षमतेतून जन्मली आहे,’ असे ट्विट कंगनाने केले.

यानंतर दुस-या ट्विटमध्ये कंगनाने डी. रूपा यांना निलंबित करण्याची मागणीही केली. ‘डी. रूपा यांना निलंबित करायला हवे. असे अधिकारी पोलिसांत असणे लज्जास्पद आहे,’ असे तिने लिहिले.

आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत

घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स

कोण आहे डी. रूपाडी. रूपा या कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. 2004 मध्ये त्या अचानक चर्चेत आल्या होत्या. 1994 च्या हुबळी दंगली प्रकरणी  मध्यप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना त्या अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी डी. रूपा यांनी अण्णाद्रमुक नेत्या शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली होती. सोशल मीडियावर परखड मत मांडण्यासाठीही डी. रूपा ओळखल्या जातात. आपल्या या परखड व दबंग स्वभावामुळे आत्तापर्यंत 41 वेळा त्यांची बदली झाली आहे.

टॅग्स :कंगना राणौत