Join us

​कंगना राणौतने पुन्हा चोळले करण जोहरच्या जखमेवर मीठ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 15:53 IST

कंगना राणौत करण जोहरचा पिच्छा सोडायला तयार नाही, असेच सध्या दिसतेय. होय, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करत, कंगनाने करण जोहरला ...

कंगना राणौत करण जोहरचा पिच्छा सोडायला तयार नाही, असेच सध्या दिसतेय. होय, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करत, कंगनाने करण जोहरला ‘मुव्ही माफिया’ संबोधले होते. कंगनाचा हा शब्दबाण करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. करणच्याच ‘कॉफी विद करण’मध्ये जाऊन कंगनाने करणला डिवचले होते. त्याच्यावर घराणेशाहीच्या निमित्ताने जोरदार टीका केली होती. ही इतकी टीका इतकी डिवचणारी होती की, करणने यावर स्पष्टीकरण देत ‘इन डिफेन्स आॅफ माय नेपोटिझम’ हा ब्लॉग लिहिला होता. पण आता या ब्लॉगच्या निमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा करणवर वार केला आहे. ‘अनुपम खेर पिपल्स’ या चॅट शोमध्ये कंगना अलीकडे सहभागी झाली. यात तिने करणवर पुन्हा टीका केली. करणचा नेपोटिझमवरचा  ब्लॉग केवळ लोकांचे ब्रेनवॉश करण्यासाठी लिहिला होता, असे कंगना म्हणाली. करणसोबतच्या वादामुळे मला काहीच फरक पडला नाही. सध्या  मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. आता तर, मी स्वत:ची निर्मिती संस्थाही सुरु केली आहे, असे ती म्हणाली.ALSO READ : ​कंगना राणौतने आपल्या योगगुरुला दिली ‘ही’ गुरुदक्षिणा!!या कार्यक्रमात कंगनाने स्टारकिड्सलाही लक्ष्य केले. स्वत:चा प्रेक्षकवर्ग, इतकच काय तर तुमच्यावर टीका करणारी लोकं मिळवण्यासाठीसुद्धा जवळपास १० वर्षे लागतात, हे कदाचित अनेक स्टारकिड्सच्या गावीही नसेल. बॉलिवूडच्या स्टार किड्सना त्यांचे प्रेक्षक निर्माण करण्याची काही गरजच नाहीये. किंबहुना त्यांना वेगळं काही असल्याची गरज कधी भासली नाहीये. अर्थात यात त्यांचा काहीच दोष नाही, असे ती म्हणाली. तिचा रोख बॉलिवूडच्या घराणेशाहीकडे होता, हे आता सांगायला नकोच. आता कंगनाच्या या टीकेला करण काय उत्तर देतो, ते बघूच!