Join us

​कंगनाला ‘या’ शब्दांनी दिला आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 20:48 IST

बॉलिवूड ‘क्विन’  कंगना राणौत सध्या प्रेमाची भाषा शिकतेयं. पण कुणासाठी? हे काही आम्हाला ठाऊक नाही. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये ...

बॉलिवूड ‘क्विन’  कंगना राणौत सध्या प्रेमाची भाषा शिकतेयं. पण कुणासाठी? हे काही आम्हाला ठाऊक नाही. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये कंगनाला नजीर यांच्या गझलेच्या काही ओळी आठवल्या. केवळ आठवल्याच नाही तर त्या तिने म्हणूनही दाखवल्या.  ‘तुझको भी जब अपनी कसमें-अपने वादे याद नहीं, हम भी अपने ख्वाब तेरी आँखों में रख कर भूल गए. मुझको जिन्होंने कत्ल किया है, कोई उन्हें बतलाये नजीर मेरी लाश के पहलु में वो अपना खंजर भूल गए,’ अशा या ओळी होत्या. मी १६ वर्षांची होते, तेव्हापासून नजीर यांची ही गझल मी ऐकते आहे. नजीर यांचे हे शब्द जणू माझा कानमंत्र आहेत. मी जेव्हा जेव्हा प्रेमात अपयशी ठरले, त्यावेळी याच शब्दांनी मला आधार दिला. याच शब्दांच्या आधाराने मी आयुष्यात पुढे गेले, असेही कंगनाने यावेळी सांगितले. कंगनाच्या आयुष्यात अनेकदा प्रेम आले आणि आले तसेच निघून गेले. पण यामुळे खचून न जाता कंगना आयुष्यात पुढे गेली. सर्वप्रथम कंगनाच्या आयुष्यात आदित्य पांचोली आला. मग अध्ययन सुमनसोबत तिचे नाव जुळले. यानंतर हृतिक रोशनसोबतचा तिचा एक एपिसोडही गाजला. पण कंगना यासगळ्यांना पुरून उरली.