नव्या वर्षात चित्रपटांची संख्या वाढविणार - काजोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:19 IST
'मी पुढील काही दिवसात मी जास्त चित्रपटात दिसेल अशी अपेक्षा करते' असा नवा वर्षाचा संकल्प अभिनेत्री काजोलने केला आहे. ...
नव्या वर्षात चित्रपटांची संख्या वाढविणार - काजोल
'मी पुढील काही दिवसात मी जास्त चित्रपटात दिसेल अशी अपेक्षा करते' असा नवा वर्षाचा संकल्प अभिनेत्री काजोलने केला आहे. 'माय नेम इज खान' या चित्रपटानंतर 2010 साली मी विश्रांती घेतली होती. कारण माझा मुलगा जन्मला होता आणि तो खूप लहान होता. आता माझा मुलगा 5 वर्षांचा झाला आहे, असेही काजोल म्हणाली. आई झाल्यानंतर मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी रुपेरी पडद्याला रामराम ठोकलेल्या काजोलने 'दिलवाले' चित्रपटातून यशस्वी पुनरागमन केले आहे. मुलगा आणि मुलगी मोठी झाल्यामुळे आता अधिक काम करायची इच्छा काजोलने व्यक्त केली आहे. 'मी 2016 च्या मध्यावर नवीन चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. पण शाहरुखसारखे वर्षाला तीन चित्रपट करणे मला शक्य नाही, असेही तिने स्पष्ट केले.