Join us  

Kader Khan's Death : अन् कादर खान यांचे ‘ते’ स्वप्न राहिले अधुरे...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 11:49 AM

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली.

ठळक मुद्देअमिताभ यांच्यासोबत कादर खान यांना एक चित्रपटही बनवायचा होता, पण नियतीला कदाचित वेगळेच काही मान्य होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. दीर्घकाळापासून कादर खान आजारी होते. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. अखेरच्या दिवसांत मुलगा आणि सून यांच्याशिवाय ते कुणालाच ओळखत नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडातील मुलाकडे राहत असलेल्या कादर खान यांना आजारावर मात करत कामावर परतायचे होते. अमिताभ यांच्यासोबत कादर खान यांना एक चित्रपटही बनवायचा होता, पण नियतीला कदाचित वेगळेच काही मान्य होते.

अमिताभ आणि कादर खान यांनी दो और दो पांच, मुकद्दर का सिकंदर , मिस्टर नटवरलाल , सुहाग, कुली, शहंशाह या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अमिताभ यांच्या अमर अकबर अँथनी , सत्ते पे सत्ता , मिस्टर नटवरलाल आणि शराबी या चित्रपटांचे डायलॉगही त्यांनी लिहिले. पण इतके पुरेसे नव्हते. कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता. एका मुलाखतीत खुद्द कादर खान यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला  जाहिल  हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, असे कादर खान या मुलाखतीत सांगितले होते. पण याचकाळात कुली  चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ गंभीर जखमी झाले ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

टॅग्स :कादर खानअमिताभ बच्चन