Join us

​जस्टीन बीबरच्या शोने केली बिपाशा बसू व सोनाली बेंद्रेची घोर निराशा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 13:01 IST

पॉपस्टार जस्टीन बीबर याचा लाईव्ह शो पाहण्यासाठी काल त्याच्या देशभरातील चाहत्यांची एकच झुंबड उडाली. सुमारे ४० हजारांवर प्रेक्षक जस्टीनला लाईव्ह पाहण्यासाठी पोहोचले. या गर्दीला सांभाळणे पोलिसांनाही कठीण केले. विशेष म्हणजे, या सगळ्या गोंधळात बिपाशा बसू, तिचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर, अभिनेत्री सोनाक्षी बेंद्र अशा काही बॉलिवूड स्टार्सची घोर निराशा झाली.

पॉपस्टार जस्टीन बीबर याचा लाईव्ह शो पाहण्यासाठी काल त्याच्या देशभरातील चाहत्यांची एकच झुंबड उडाली.  सुमारे ४० हजारांवर प्रेक्षक जस्टीनला लाईव्ह पाहण्यासाठी पोहोचले. या गर्दीला सांभाळणे पोलिसांनाही कठीण केले. विशेष म्हणजे, या सगळ्या गोंधळात बिपाशा बसू, तिचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर, अभिनेत्री सोनाक्षी बेंद्र अशा काही बॉलिवूड स्टार्सची घोर निराशा झाली. इतकी की, बिपाशा व करणला तर आल्या पावलीच घरी परतावे लागले. बिपाशाने तिच्या सोशल अकाऊंटवर याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  बिपाशा व करण मोठ्या हौसेने बीबरच्या कॉन्सर्टला पोहोचले होते. पण अंगरक्षक सोबत नसल्याने आणि तोबा गर्दी  असल्याने त्यांना बीबरला न पाहताच परतावे लागले. ‘आम्ही अंगरक्षक घेऊन आलो नाही आणि इथे प्रचंड गर्दी आहे, त्यामुळेच आम्ही निघतोय,’ असे बिपाशा बासूने कॉन्सर्टस्थळीच जाहिर करून टाकले होते. मग काय, बीबरचा शो नाही तर डिनरच एन्जॉय करू, या विचाराने बिप्स व करण दोघे डिनरसाठी गेले. त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर तिने शेअर केला. पण म्हणून काही बीबरला बघता आले नाही, हे शल्य पुसले गेले नाही. डिनरच्या या फोटोसोबत बिपाशाने अजून एक फोटो शेअर केला. एवढे तयार होण्याचा काहीच फायदा झाला नाही, असे ती म्हणाली. केवळ बिपाशाच नाही तर सोनाली बेंद्रेनेही या शोवर नाराजी व्यक्त केली. सोनाली आपल्या मुलांसोबत हा शो पाहायला गेली होती. पण तिला या शोची व्यवस्था फारशी आवडली नाही.  कार्यक्रमाचे नियोजन जस्टिनप्रेमी भारतीयांना मनमुराद आनंद देऊ शकले नाही. त्यामुळे तो केवळ वेळखाऊपणा ठरला, असे ती म्हणाली.