Join us  

केवळ तीन वर्षात तापसी पन्नू बनली कोट्यवधीची मालकीण, जगते आलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 2:52 PM

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून तापसी कोट्यवधी रुपये कमावते.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिग्दर्शक अनुराग कश्यपआणि विकास बहल यांच्या घरावर आयकर विभागाची छापे टाकले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती मोठे पुरावे लागल्याचं यातून समोर आलं होतं. सतत तीन दिवस अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि ऑफिसवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. त्यानंतर दोघांच्या संपत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यात मात्र तापसी पन्नूच्या संतपत्तीचा आकडा जाणून चाहत्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का लागला आहे. 

तापसी पन्नू वर्षाकाठी किमान 4 कोटी रुपये कमवते. अशा प्रकारे, तिची एका महिन्याची कमाई 30 लाखांहून अधिक असू शकते. 2019-2020 मध्ये तापसी चित्रपटांसाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घ्यायची. मात्र, आता तिने तिच्या मानधनात वाढ केली होती. त्यानुसार चित्रपटासाठी 8 कोटी रुपये मानधन घेते. 

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून तापसी कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार तापसीकडे  ४४ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय तिच्याकडे बड्या कंपन्यांच्या महागड्या आलिशान कार आहेत. तापसीकडे बीएमडब्ल्यू 5 सीरीज, मर्सिडीज एसयूव्ही आणि रेनॉल्ट कॅप्चर या गाड्या आहेत.

इतकेच नाहीतर अंधेरीमध्ये तापसीचे आलिशान दोन मोठे फ्लॅट्स आहेत. त्यातील एका फ्लॅटमध्ये सध्या ती राहत आहे. हा 3 बीएचके फ्लॅट आहे. तीन वर्षे तेलगू चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तापसीने 2013 मध्ये 'चश्मे-बद्दूर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 

यानंतर,  'बेबी', 'बदला', 'सांड की आँख', 'मिशन मंगल', 'मनमर्जिया', 'थप्पड' या चित्रपटांमध्ये दिसली. 'हसीन दिलरुबा', 'लूप लपेटा', 'रश्मी रॉकेट' आणि 'शाबाश मिठू' हे तापसीचे आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

टॅग्स :तापसी पन्नू