Join us  

बच्चन कुटुंबासाठी केलेल्या ट्विटमुळे जुही चावला ट्रोल; युजर्स म्हणाले, तुझी लक्षणं ठीक दिसत नाहीत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:52 AM

जुहीने बच्चन कुटुंबाच्या प्रार्थना करणारे  ट्विट केले. पण हे काय, या  ट्विटनंतर नेटक-यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. 

ठळक मुद्देट्रोल होताच जुहीने ते  ट्विटलगेच डिलीट केले आणि आणखी एक नवे  ट्विट केले.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चाहते चिंतेत आहेत. देशभरातील चाहते बच्चन कुटुंब लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कलाकारांनी ट्विट करत विशेषत: अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.  अभिनेत्री जुही चावला त्यापैकीच एक़ जुहीने बच्चन कुटुंबाच्या प्रार्थना करणारे  ट्विट केले. पण हे काय, या  ट्विटनंतर नेटक-यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. 

‘आमित जी, अभिषेक आणि आयुर्वेदा लवकरच बरे होतील,’ असे  ट्विट जुहीने केले आणि तिच्या या  ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जुहीने ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचे नाव चुकून आयुर्वेदा लिहिलेले समजून  नेटक-यांनी जूहीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

जुहीचे हे  ट्विट पाहून युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट केल्यात. ही आयुर्वेदा आहे तरी कोण? असा प्रश्न एका युजरने केला तर अन्य एकाने ‘तुझी लक्षणे देखील ठीक दिसत नाहीत, तू सुद्धा काळजी घे,’ अशा शब्दांत जुहीला ट्रोल केले. अन्य एकाने ‘केश किंगची जाहिरात केल्यामुळे तिच्या मनात आयुर्वेदाने घर केले आहे आणि त्याचा हा परिणाम आहे,’ असे लिहिले. एकंदर काय तर जुही या  ट्विटमुळे चांगलीच ट्रोल झाली. 

ती चूक नव्हती...

ट्रोल होताच जुहीने ते  ट्विटलगेच डिलीट केले आणि आणखी एक नवे  ट्विट केले. ‘अमितजी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या... तुम्ही लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना करते. माझे पहिले  ट्विट टायपो एरर नव्हते. माझा अर्थ आयुर्वेदाशी होता. जे लवकर ठीक होण्यास मदत करेल,’असा खुलासा  तिने केला.

टॅग्स :जुही चावला अमिताभ बच्चन