Join us  

जुही चावलाचे हिऱ्याचे कानातले शोधून द्या आणि बक्षीस मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 10:20 AM

हे माझे मॅचिंग पीस आहे. 15 वर्षांपासून मी ती घालते आहे. प्लीज शोधण्यासाठी मदत करा,’ असे  जुहीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्दे महिनाभरापूर्वी जुहीने एअरपोर्ट अधिका-यांवर भडास काढली होती. तिने एक व्हिडीओ शेअर करत एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ  इंडियाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.

होय, जुही चावलाचे हिऱ्याचे कानातले शोधून द्या आणि बक्षीस मिळवा! बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाचे डायमंडचे ईअररिंग्स हरवले असून ते शोधून देणा-यास योग्य बक्षीस मिळणार आहे. खुद्द जुहीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.रविवारी मुंबई एअरपोर्टवर जुहीचे हि-याचे कानातले कुठेतरी पडले. कानातले हरवले आणि जुही अस्वस्थ झाली. जुहीने ट्विटरद्वारे कानातले हरवल्याची माहिती शेअर केली. ‘ रविवारी सकाळी  मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर 8 मधून जात होते.  Emirates Counter  वर मी चेक-इन केले. सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. कृपया ते शोधण्यामध्ये माझी मदत करा. कानालते सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या. शोधणा-यास बक्षीस दिले जाईल. हे माझे मॅचिंग पीस आहे. 15 वर्षांपासून मी ती घालते आहे. प्लीज शोधण्यासाठी मदत करा,’ असे  जुहीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटमध्ये जुहीने या हिऱ्याच्या कानातल्याचा फोटोही शेअर केला आहे. तिचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होतेय. हरवलेले कानातले शोधण्यासाठी जुही जीवाचा इतका आटापीटा करतेय, म्हटल्यावर ते तिच्यासाठी किती खास आणि अनमोल असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. महिनाभरापूर्वी जुहीने एअरपोर्ट अधिका-यांवर भडास काढली होती. तिने एक व्हिडीओ शेअर करत एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ  इंडियाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. विमानतळावरील गर्दी आणि खराब व्यवस्था यावर तिने ताशेरे ओढले होते.त्यापूर्वी, तिने घरी भाजीपाला पोहचवण्याबद्दलचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या सर्व भाज्या प्लास्टिक पॅकमध्ये असल्यामुळे खूप अस्वस्थ झाले आहे. अशा प्रकारे माझ्या घरी काही भाज्या पोचवल्या आहेत. सुशिक्षित लोकांनी पृथ्वीचे सर्वाधिक नुकसान केले. अशावेळी हसावे की रडावे हेच समजत नाही, असे तिने म्हटले होते.

 

टॅग्स :जुही चावला