Join us  

Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 10:19 AM

कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने सजलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कन्फ्युजन.

ठळक मुद्देयेत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रकाश कोवेलामुडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने सजलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कन्फ्युजन. होय, सुरुवातीपासून अखेरपर्यंत कन्फ्युजन आणि कन्फ्युजन असलेल्या या ट्रेलरने तुमची उत्सुक आणखी ताणली जाते.बालाजी मोशन पिक्चरच्या यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. २ मिनिटे आणि ३७ सेकंदांच्या हा ट्रेलर फार दमदार आहे. हा ट्रेलरमध्ये  कंगना आणि राजकुमारची तुफान जुगलबंदी पाहायला मिळते.

सिनेमात दुहेरी हत्याकांड दाखवण्यात आले आहे. या खुनाची चौकशी पोलीस करत असतात. अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर बॉबी (कंगना राणौत) आणि केशव (राजकुमार राव) या दोघांपैकी एकाने खून केल्याच्या निर्णयापर्यंत पोलिस पोहोचतात. आपल्या चित्र- विचीत्र वागण्यामुळे संकटात अडकलेल्या कंगनापुढे पोलिस  दोन पर्याय ठेवतात. एक तर २० हजार रुपयांचा दंड भर किंवा मेंटल हॉस्पीटलमध्ये जा, असे हे दोन पर्याय. यावर कंगना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडते. तिकडे राहत असतानाच ती राजकुमारकडे आकर्षित होते. पण याचदरम्यान  राजकुमारनेच खून केला असून यात आपण नाहक फसत असल्याचे तिला कळते. अखेर कंगना आणि राजकुमार एकमेकांविरुद्ध उभे राहतात.

येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रकाश कोवेलामुडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कनिका ढिल्लो हिने कथा लिहिली असून एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘मेंटल है क्या’ असे होते. पण अनेक वादानंतर आता हे नाव बदलून ‘जजमेंटल है क्या’ असे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :मेंटल है क्याकंगना राणौतराजकुमार राव