Join us  

जे.पी. दत्तांचा 'पलटन' चित्रपट ७ सप्टेंबरला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 3:03 PM

'पलटन' चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर व एलओसी या सिनेमांचा उल्लेख करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे'पलटन' चित्रपट 1967 साली झालेल्या भारत व चीन युद्धावर आधारीत

'बॉर्डर' आणि 'एलओसी' यांसारख्या देशभक्तीपर चित्रपटाचे दिग्दर्शक जे.पी. दत्ता 'पलटन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. हा मल्टीस्टारर चित्रपट असून नुकतेच या चित्रपटातील पात्रांचे लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'पलटन' चित्रपटाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी ११ सप्टेंबरला सिक्कीम सीमेवर भारत-चीन युद्ध सुरू झाले होते. त्याच आठवड्यात 7 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'पलटन' चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर व एलओसी या सिनेमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात बर्फाळ पर्वत सर करत असताना सैनिक वंदे मातरमचे नारे देताना दिसत आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटातील स्टारकास्टचे लूक ट्विटरवर शेअर केले आहेत.

'पलटन' चित्रपट 1967 साली झालेल्या भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. जे. पी. दत्ता पुन्हा एकदा देशाचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर, लव सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.'पलटन' चित्रपटातील कलाकारांचा लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

टॅग्स :अर्जुन रामपालसोनू सूदजॅकी श्रॉफ