Join us  

'मेरे ख्यालों की मल्लिका'! जोशमधील 'ती' अभिनेत्री सध्या काय करते माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:00 AM

Priya gill : जोश प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी प्रिया गिल आणि ऐश्वर्याच्या सौंदर्याची तुलना केली होती.

ठळक मुद्देत्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता अद्यापही यत्किंचितही कमी झालेली नाही.

दिग्दर्शक मन्सूर खान यांचा ‘जोश’ चित्रपट आठवतोय? या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्याने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यात ऐश्वर्याने शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता अद्यापही यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळे हा चित्रपट लागला की आजही अनेक जण तो पाहताना एन्जॉय करतात. या चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्यासह अनेक कलाकार झळकले होते. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. मात्र, सध्या ही अभिनेत्री कुठे आहे?, काय करते? हे अनेकांना ठावूक नाही.

'जोश'मध्ये प्रिया गिलने शाहरुखच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. संगीतावर अफाट प्रेम असलेल्या या तरुणीचं मनं जिंकण्यासाठी मॅक्सने (शाहरुख) प्रचंड मेहनत घेतली होती. यात त्याच्या बहिणीने शर्लीनेदेखील ( ऐश्वर्या राय) त्याला मदत केली होती. विशेष म्हणजे चित्रपटाच प्रियाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि सौंदर्यामुळे तिने अनेकांची मनं जिंकून घेतली होती. इतकंच नाही तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी तिच्या आणि ऐश्वर्याच्या सौंदर्याची तुलना केली होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रिया कलाविश्वापासून दूर गेल्याचं पाहायला मिळालं.

प्रिया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावही फारशी अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे आहे? काय करते? याविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडतात. मात्र, अलिकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून जोशमध्ये तिच्या चेहऱ्यावर झळकलेले निरागस भाव आजही पाहायला मिळतात. या फोटोमध्ये तिने व्हाइट रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे- कलरचं जॅकेट घातलं होतं.

coolie accident : अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या पुनित इस्सरच्याच पत्नीने वाचवले होते बिग बींचे प्राण

दरम्यान, जोशसोबतच प्रियाने फार मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं. यात सिर्फ तुम या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. यात अभिनेता संजय कपूरने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाशाहरुख खानऐश्वर्या राय बच्चन