Join us

OMG! या बॉलिवूड सुपरस्टारने 18 वर्षांत केवळ पाच दिवस घेतली सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 08:00 IST

बॉलिवूडचा हा सुपरस्टार फार कमी चर्चेत असतो. याचे कारण म्हणजे, तो स्वत:बद्दल फार कमी बोलतो.

ठळक मुद्देजॉनचा ‘फोर्स’ हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. पण या चित्रपटामागची एक इंटरेस्टिंग स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहम तसा फार कमी चर्चेत असतो. याचे कारण म्हणजे, जॉन स्वत:बद्दल फार कमी बोलतो. ना बॉलिवूड पार्ट्यांना तो दिसत, ना कुठल्या अवार्ड फंक्शनमध्ये. चर्चेत राहण्यापेक्षा स्वत: कामात झोकून देणे त्याला आवडते. एक चित्रपट केला की, कामाचा क्षीण घालवण्यासाठी विदेशात हॉलिडेवर जाणारे अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये आहेत. पण जॉन अब्राहम याला अपवाद म्हणायला हवा. होय, गेल्या 18 वर्षांत जॉनने फक्त पाच दिवस सुट्टी घेतली, यावरून याचा अंदाज यावा.

होय, एका चॅट शोमध्ये खुद्द जॉनने हा खुलासा केला. ‘मी माझ्या स्वत:वर काहीही खर्च करत नाही. कारण मला ते आवडत नाही. मी अतिशय वर्कहोलिक पर्सन आहे. गेल्या 18 वर्षांत मी केवळ पाच दिवसांची सुट्टी घेतली,’ असे जॉनने यावेळी सांगितले.

ऑटो रिक्षाचालक मित्राखातर बनवला ‘फोर्स’जॉनचा ‘फोर्स’ हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. पण या चित्रपटामागची एक इंटरेस्टिंग स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी. होय, जॉनने त्याच्या एका ऑटो रिक्षा चालवणा-या मित्राच्या म्हणण्यावरून हा सिनेमा बनवला होता.

याबद्दल जॉनने सांगितले की, माझा मित्र सुकू एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. तो रोज मला घरून ऑफिसात आणि ऑफिसातून घरी सोडतो. एकदा आम्ही दोघे ‘काखा काखा’ हा तामिळ सिनेमा पाहायला गेलोत. त्याने मला या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा सल्ला दिला. मी त्याचा सल्ला मानला आणि ‘फोर्स’ नावाने या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला.लवकरच मुंबई सागा, अटॅक आणि सत्यमेव जयते 2 या सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :जॉन अब्राहम