Join us  

बाबो! जॉन अब्राहमच्या मुंबईतील नवीन घराची किंमत माहितीये का? ४०-५० कोटी नाही तर थेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 12:01 PM

27 डिसेंबर रोजी जॉन अब्राहमने या बंगल्यासाठी करार केला.

John Abraham Bunglow: बॉलिवूडचा सर्वात फिट आणि बॉडीबिल्डर अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) मुंबईत बंगला खरेदी केला आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल. मुंबईच्या खार स्थित लिंकिंग रोड या प्राईम परिसरात त्याने बंगला खरेदी केला आहे. याचं नाव 372 निर्मल भवन असं असून हा बंगला 7722 स्क्वेअर फीटमध्ये पसरला आहे. त्याने प्रवीण नत्थालाल शाह यांच्याकडून जॉनने हा बंगला खरेदी केला आहे. 

इंडेक्सटॅप डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार, 27 डिसेंबर रोजी जॉन अब्राहमने या बंगल्यासाठी करार केला. समुद्राचं विस्तीर्ण दृश्य या बंगल्यातून दिसतं. बंगल्याच्या खरेदीसाठी जॉनने 4.24 कोटी स्टॅम्प ड्युटीच भरली आहे. खार सारख्या बिझनेस आणि फिल्म स्टार्सच्या प्राईम लोकेशनमध्ये जॉनने इतका महागडा बंगला खरेदी केला आहे. 

नक्की किती आहे बंगल्याची किंमत?

जॉन अब्राहमने खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत तब्बल 70.83 कोटी रुपये आहे. म्हणूनच तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जॉन अब्राहम केवळ अभिनेता नसून निर्माता आणि उद्योजकही आहे. GQ India नुसार, 2023 मध्ये जॉनची नेटवर्थ 251 कोटी रुपये होती. याशिवाय त्याच्याकडे अत्यंत महागड्या कार आणि बाईक्सचं कलेक्शन आहे. यामध्ये Lamborghini Gallardo चाही समावेश आहे.  

बांद्रा येथे त्याचं आलिशान पेंटहाऊस आहे जे ४ हजार स्क्वेअर फूटवर पसरलं आहे. याची किंमतच तब्बल 60 कोटी रुपये आहे. त्याच्या या अपार्टमेंटला 2016 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरल डिझाईनकडून बेस्ट होमचा पुरस्कार मिळाला होता. जॉनचे वडील आणि भावाने हे घर डिझाईन केलं होतं.  याशिवाय त्याची अमेरिकेच्या लॉस एंजेलिस आणि लंडन येथेही प्रॉपर्टी आहे. हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेज, ब्रॅड पिट आणि बियॉन्स जिथे राहतात त्याच परिसरात जॉनचं घर आहे. लंडनमध्ये जॉनच्या प्रॉडक्शन हाऊसचं ओव्हरसीज हेडक्वॉर्टर आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूडसुंदर गृहनियोजनमुंबई