Join us  

जाॅन अब्राहम करणार अनिल कपूरसोबत 'पागलपंती'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 7:25 PM

जॉन अब्राहम आणि मिस्टर इंडिया म्हणजेच अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

ठळक मुद्दे जॉन अब्राहम आणि अनिल कपूर दिसणार 'पागलपंती' सिनेमात

बॉलिवूडमधील हॅण्डसम हंक म्हणजचे जॉन अब्राहम आणि मिस्टर इंडिया म्हणजेच अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ते दोघे 'पागलपंती' या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. जॉन अब्राहम आणि अनिल कपूर यांनी एकत्र 'वेलकम बॅक', 'शूटआऊट अॅट वडाला' या सिनेमात एकत्र काम केले आहे. आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघे अनीस बझ्मी दिग्दर्शित 'पागलपंती' चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा काॅमेडी असणार आहे. कुमार मंगत पाठक हे सिनेमाचे निर्माते असणार आहेत. जॉन व अनिल कपूर यांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीनवर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

जाॅन सध्या 'बाटला हाउस' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. १३ सप्टेंबर २००८ साली दिल्लीतील करोल बाग, कनाट प्लेस, इंडिया गेट व ग्रेटर कैलाश येथे एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्घटनेत २६ लोक मृत्यूमुखी पडले होते व १३३ लोक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी या बॉम्बस्फोटोसाठी दहशतवादी संघटना इंडियान मुजाहिद्दीनला जबाबदार धरले होते. या घटनेच्या सहा दिवसानंतर १९ सप्टेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची सूचना मिळाली होती की इंडियन मुजाहिद्दीन संघटनेटे पाच आंतकवादी बाटला हाऊसमधील एका घरात राहत आहेत. 'बाटला हाऊस' चित्रपट १५ ऑगस्ट, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अनिल कपूरजॉन अब्राहम