मादाम तुसा म्युझियममध्ये लागणार करण जोहरचा पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 13:05 IST
मादाम तुसा मध्ये असलेल्या बॉलिवूडच्या पुतळ्यांमध्ये आता आणखीन एक नाव सामिल होणार आहे ते नाव आहे करण जोहरचे. बॉलिवूडचा फिल्ममेकर करण जोहरचा पुतळासुद्धा लंडनच्या मादाम तुसामध्ये लागणार आहे.
मादाम तुसा म्युझियममध्ये लागणार करण जोहरचा पुतळा
मादाम तुसा मध्ये असलेल्या बॉलिवूडच्या पुतळ्यांमध्ये आता आणखीन एक नाव सामिल होणार आहे ते नाव आहे करण जोहरचे. बॉलिवूडचा फिल्ममेकर करण जोहरचा पुतळासुद्धा लंडनच्या मादाम तुसामध्ये लागणार आहे. मादाम तुसामध्ये पुतळा उभारण्यात येणारा करण जोहर हा पहिला निर्माता आणि दिग्दर्शक असणार आहे. करणने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर दिली. मादाम तुसा म्युझियम दिल्लीशिवाय अनेक देशात आहे. सिंगापूर, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मादाम तुसा म्युझियम आहे. करणच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे पुतळे याठिकाणी उभारण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, सनी लियोनी, करिना कपूर, कॅटरिना कैफ आणि शाहरुख खानच्या नावाचा समावेश आहे. आता यात करण जोहरचे नाव देखील सामिल झाले. करण जोहरच्या पुतळ्याचे मोजपाम घेण्यासाठी एक टीम भारतात आली देखील आहे. जनवारीत याच ठिकाणी वरुण धवनने एंट्री घेतली होती. मादाम तुसामध्ये पोहोचलेला वरुण हा सगळ्यात कमी वयाचा बॉलिवूड स्टार आहे. करण जोहरने आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टारर 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून केली होती. याआधी करणने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी असिस्टेंड डायरेक्टर म्हणून काम केले होते. करणने 20 वर्षांपूर्वी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. करण सध्या बॉलिवूडमधील मोठ्या 10 चित्रपटांवर काम करतो आहे. ज्यात अक्षय कुमारचा केसरी. रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र, स्टुडेंट ऑफ द इअर, सिम्बा, धडक आणि ड्रायव्ह सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट 'राजी' पुढच्या महिन्यार रिलीज होणार आहे. याशिवाय त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'कलंक'ची शूटिंग सुरु झाली आहे. यात आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. पुढील वर्षी 19 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल.