Join us

ईशान खट्टरसोबत पुन्हा स्पॉट झाली जान्हवी कपूर, कॅमेरे दिसताच वेगवेगळ्या वाटेवरून गाठले घर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 22:10 IST

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची रीतसर घोषणा करण्यात आली आहे. वृत्तानुसार जान्हवी आणि ...

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची रीतसर घोषणा करण्यात आली आहे. वृत्तानुसार जान्हवी आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लवकरच मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये बघावयास मिळणार आहेत. जेव्हा ही घोषणा झाली तेव्हापासून जान्हवी आणि ईशान एकत्र बघावयास मिळत आहेत. दीपिका पादुकोणनी दिलेल्या पार्टीत हे दोघे एकत्र बघावयास मिळाले होते. त्यानंतर आता हे दोघे मुंबईतील एका हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी गेले असता एकत्र स्पॉट झाले. यादरम्यान दोघांनी कॅमेºयापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या वाटेनी जाणे पसंत केले. यावेळी जान्हवी निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये बघावयास मिळाली, तर ईशान ब्लॅक कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसला. खरं तर सुरुवातीपासूनच हे दोघे एकमेकांसोबत फिरताना यापूर्वीही दिसले आहेत. त्यातच आता हे दोघे ‘सैराट’मध्ये एकत्र झळकणार असल्याने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पुढील महिन्यात सैराटच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असल्याने लवकरच हे दोघे राजस्थानला रवाना होणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत ‘सैराट’च्या हिंदी रिमेकची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच करणने चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत. वृत्तानुसार चित्रपटाची शूटिंग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट सैराटची कॉपी नसणार आहे, तर यामध्ये बरेचसे बदल केले जाणार आहेत. २०१६ मध्ये मराठीत आलेल्या ‘सैराट’मध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर हिंदी रिमेकमध्ये जान्हवी आणि ईशान लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहेत. शशांक खेतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात रिलीज होणार आहे.