Join us  

Jayaprada : विवाहित अभिनेत्याशी लग्न करुनही एकट्या राहतात जयाप्रदा, आई होण्याचं सुखही मिळालं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 11:28 AM

पहिल्या सिनेमासाठी जयाप्रदा यांना मिळालं केवळ 10 रुपये मानधन

Jayaprada : 60 ते 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा आज 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जयाप्रदा यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत साऊथपासून बॉलिवूडपर्यंत राज्य केले. आता त्या राजकारणात सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन, जितेंद्र, विनोद खन्ना यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी जमली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही लक्षवेधी गोष्टी 

जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्रप्रदेशमध्ये झाला. त्यांचं खरं नाव ललिता रानी. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. आज त्या कोट्यवधी रुपयांच्या मालकीण आहेत. मात्र पहिल्या कमाईतून त्यांना केवळ १० रुपयांचे मानधन मिळाले होते. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांचं नृत्य तेलुगू दिग्दर्शकाने पाहिलं आणि त्यांनी जयाला 'भूमि कोसम' सिनेमात डान्सची ऑफर दिली. यासाठी त्यांना १० रुपये मिळाले होते. अशा प्रकारे 14 व्या वर्षीच त्यांचं फिल्मइंडस्ट्रीत पदार्पण झालं. 

1979 साली जयाप्रदा यांनी 'सरगम' सिनेमातून डेब्यू केला. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. तेव्हापासून जयाप्रदा आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सहभागी झाल्या. त्यांना या सिनेमासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केले. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 80 च्या दशकात जयाप्रदा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेसृष्टीत काम केल्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. त्यांनी तेलुगू देशम पार्टी जॉईन केली. मात्र काही मतभेदानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडून रामपूरची जागा लढली होती आणि जिंकूनही आल्या. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जेव्हा जया करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांचं नाव निर्माता श्रीकांत नाहाटा यांच्याशी जोडलं गेलं. सुरुवातीला त्यांनी या नात्याला मैत्रीचं नाव दिलं. मात्र अचानक 1986 साली त्यांनी श्रीकांत नाहाटा यांच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हा नाहाटा विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती. जयाप्रदा यांच्याशी लग्न केल्यानंतरही त्यांनी पहिल्या पत्नीला सोडलं नाही. तसंच त्यांनी कधीच जयाप्रदा यांना आई होण्याचं सुख दिलं नाही. यामुळे दोघांच्या नात्यात कटुता आली आणि दोघंही विभक्त झाले. नंतर जयाप्रदा यांनी बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आणि आज त्या त्याच्यासोबतच राहत आहेत.

टॅग्स :जया प्रदाबॉलिवूडराजकारण