Join us

जयललितांचे निधन : अभिनेत्री ते मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 10:10 IST

भारतीय राजकारणात स्वत:ची वेगळी छाप सोडून जाणाऱ्या आणि तामिळ जनतेच्या मनामनावर राज्य करणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता  यांची गेले ...

भारतीय राजकारणात स्वत:ची वेगळी छाप सोडून जाणाऱ्या आणि तामिळ जनतेच्या मनामनावर राज्य करणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता  यांची गेले दोन महिने विविध आजारांशी सुरू असलेली झुंज अखेर मृत्यूने जिंकली. चाहत्यांच्या अम्मा गेल्या.गेले दोन महिने 67 वर्षीय जयललिता यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु रविवारी सायंकाळी हृदयक्रिया बंद (कार्डियाक अ‍ॅरेस्ट) पडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांना ‘लाइफ सपोर्ट’ यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.मात्र, सोमवारी रात्री 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे अपोलो रग्णालयाने जाहीर केले. तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री ते मुख्यमंत्री प्रवासदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची अनभिषक्त सम्राजी म्हणून वावरणाऱ्या जयललितांनी मोठ्या पडद्यावरची अभिनयाची कारकिर्द मध्येच सोडून राजकारणात प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरे तर सिनेमातून राजकारणात अशी परंपरा तामिळी-तेलुगु राजकारणात आहे. जयललितांनी हीच परंपरा पुढे नेली. पण अभिनेत्री ते मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा जयललितांचा प्रवास खचितच सोपा नव्हता. त्यांच्या फिल्मी करिअरवर टाकलेली ही नजर...टर्निंग पॉर्इंट                                   २४ फेब्रुवारी १९४८ रोजी कर्नाटकातील म्हैसूर शहरात जन्मलेल्या जयललिता यांना अभिनयातच अधिक स्वारस्य होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे वेध त्यांना शालेय जीवनापासून लागले होते. जयरामन आणि संध्या या दांपत्याची कन्या असलेली ही देखणी कन्या बंगलोरला बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत असताना नाटकात काम करायची.वयाच्या चवथ्या वर्षांपासून नृत्यांचे धडे घेणारी जयललिता नंतर एक निष्णात नृत्यांगना बनली.१९६४ साली मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठीची भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवली. परंतु, शिक्षण पूर्ण करण्याऐवजी त्यांनी चित्रपटसृष्टीचा रस्ता निवडला.हाच जयललितांच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट होता. तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्यालम सिनेमांमध्ये जयललितांनी अभिनय केला. जिवंत अभिनय आणि अदा यासाठी लोक त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असायचे. आईकडून मिळाला अभिनयाचा वारसा                                                             जयललिता दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर आई जयललितांना घेऊन बंगळुरुला गेली. तिथे आईने तामीळ सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. जयललिता यांचं शालेय शिक्षण सुरु असतानाच आईने त्यांना सिनेमात काम करण्यासाठी तयार केलं.इंग्लिश भाषेत असलेला  ‘एपिसल’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत जयललिता आपल्या आईसोबत एका कार्यक्रमात गेल्या. याठिकाणी निर्माता व्ही आर पुथूलू यांनी जयललितांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली.आईने जयललितांचे मन वळवले आणि जयललितांनी या चित्रपटास होकार दिला. आपल्या दुसऱ्याच चित्रपटात जयललितांना तामिळ सुपरस्टार एमजी रामचंद्रन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. कन्नड सिनेमात अभिनय                                             पंधरा वर्षांच्या वयात त्यांनी कन्नड सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती.  कन्नड भाषेतील ‘श्री शैला महात्मा’ हा जयललितांचा पहिला चित्रपट होता़ १९६१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला़ यात जयललितांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती़.यानंतर १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चिन्नाडा गोम्बे’ हा अभिनेत्री म्हणून जयललितांचा पहिला कन्नड चित्रपट.  चिन्नडा गोम्बे, वेन्निरा अडाई आणि इज्जत ही आहेत. अनुक्रमे कानडी, तामिळ आणि हिंदी सिनेमांची नावं. पण हे सिनेमे साधुसुधे नाही. किमान तामिळींसाठी तर नाहीतच कारण त्यांच्या अम्मा अर्थात जयललितांच्या या डेब्यु फिल्म आहेत. तामिळ सिनेमांकडे वळवला मोर्चा                            यानंतर जयललिता तामिळ सिनेमांकडे वळल्या. सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्रीधर यांच्या ‘वेन्नीरादई’पासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. केवळ तामिळच नाही तर तेलगू, कन्नड, इंग्रजी शिवाय हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. १९६८ मध्ये आलेल्या 'इज्जत' या हिंदी चित्रपटातही त्या दिसल्या़ यात धर्मेंन्द यांनी भूमिका साकारली होती़ एमजीआरसोबतची जयललितांची जोडी                            जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत २८ चित्रपटांमध्येकाम केले़ एमजीआर तामिळचे सुपरस्टार होते आणि भारतीय राजकारणातील सन्माननीय नेत्यांपैकी एक गणले जात होत़े़  त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते एम जी रामचंद्रन यांच्यासोबतची जयललितांची जोडी फारच लोकप्रिय झाली. 1965 ते 1972 या काळात त्यांनी अनेक चित्रपट एम जी रामचंद्रन यांच्यासोबत केले.  तामिळमधील पहिली बोल्ड अभिनेत्री                 जयललिता यांना तामिळमधली पहिली बोल्ड अभिनेत्री म्हटले जाते. त्याकाळात पडद्यावर स्कर्ट घालण्यास कुठलीही अभिनेत्री धजावत नसे. पण जयललितांनी ही हिंमत दाखवली. पडद्यावर स्कर्ट घालणाऱ्या त्या पहिल्या तामिळ अभिनेत्री ठरल्या.  दक्षिणेतील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून जयललिता त्याकाळात सुप्रसिद्ध होत्या.शानदार अभिनयासाठी त्यांना तीनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या (साऊथ)फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवाजी गणेशन यांचा तामिळ सिनेमा ‘पत्तिकादा पत्तानमा’साठी सन १९७१ मध्ये त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. याचवर्षी ‘श्री कृष्ध सत्य’साठी त्यांना दुसरा फिल्मफेअर मिळाला.यानंतर १९७३ मध्ये ‘सुर्यकंथी’साठी तिसºया फिल्मफेअरने त्यांना गौरविले गेले. १९८० च्या दशकात त्यांच्या फिल्मी करिअरचा वेग थोडा मंदावला. ‘नाधियाई ठेडी वन्धा कदल’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. यानंतर त्यांनी अभिनयातून राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.