Join us  

आधी नात, आता आजी...! तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानाने खवळल्या जया बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:33 AM

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल विधान केले आणि फसले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला.

ठळक मुद्देबाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात,हे कसले संस्कार आहेत? असे विधान केले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल विधान केले आणि फसले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल बोलणा-या तीरथ सिंह रावत यांना सणसणीत उत्तर दिले होते. आता नव्या नवेलीची आजी आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही तीरथ सिंह यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

एका मुख्यमंत्र्याने असे विधान करणे हे शोभा देत नाही. या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. आजच्या युगात तुम्ही असे काही बोलता. आता लोकांच्या कपड्यांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का? ही एक घाणेरडी विचारवृत्ती आहे आणि यामुळे महिलांवरच्या अत्याचारात वाढ होतेय, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली.

काय म्हणाली होती नव्या?

काल जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. शिवाय रिप्ड जीन्स घातलेला एक फोटो शेअर केला होता. ‘ Wtf, आमचे कपडे बदलण्याआधी आपले विचार बदला. मी रिप्ड जीन्स घालणार आणि अभिमानाने मिरवणार,’ असे नव्याने तिच्या इन्स्टास्टोरी पोस्टमध्ये लिहिले होते.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत?बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात,हे कसले संस्कार आहेत? असे विधान केले होते.  तीरथ सिंह रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला होता.‘एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलेकी, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलेकी कुठे जायचेय? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला.महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते,’असे ते म्हणाले होते.

टॅग्स :जया बच्चननव्या नवेली