Join us

जावयाने साजरा केला सासऱ्यांचा बर्थडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 09:53 IST

 वेल, शीर्षक वाचून विचारात पडला असाल ना की, कोण एवढा जावई आहे की त्याने आपल्या सासऱ्यांचा  बर्थडे सेलिब्रेट केला? ...

 वेल, शीर्षक वाचून विचारात पडला असाल ना की, कोण एवढा जावई आहे की त्याने आपल्या सासऱ्यांचा  बर्थडे सेलिब्रेट केला? अहो... कोणी नाही करण सिंग ग्रोव्हर.नवदाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे नुकतेच त्यांच्या हनीमून ट्रीपहून परतले असून बिपाशाच्या वडीलांचा हिरक बासु यांचा वाढदिवस होऊन गेला.पण, त्यावेळी हे दोघे हनीमूनला गेले होते. त्यामुळे ते जसे मुंबईत दाखल झाले. त्यांनी लगेचच तिच्या बाबांचा बर्थडे केक कापून सेलिब्रेट केला. एप्रिल महिन्यांत दोघे एकमेकांसोबत विवाहाच्या नाजूक बंधनात अडकले गेले होते. बंगाली पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले.