Join us  

रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळवणारे जावेद अख्तर पहिले भारतीय व्यक्ती,तर शबाना आझमी यांनी दिली ही प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 10:04 AM

पुरस्कार मिळाल्याची बातमी कळाल्यानंतर जावेद म्हणाले, एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय. माझ्या धर्मनिरपेक्ष विचारांशी जगातील अनेक लोक सहमत आहेत ही माझ्यादृष्टीने आनंदाची बाब आहे.

लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. जावेद अख्तर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा  खोवला गेला आहे.  यंदा प्रतिष्ठेचा रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्युच्च दर्जाचे कार्य आणि तर्कनिष्ठ वक्तव्यांबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. 

पुरस्कार मिळाल्याची बातमी कळाल्यानंतर जावेद म्हणाले, एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय. माझ्या धर्मनिरपेक्ष विचारांशी जगातील अनेक लोक सहमत  आहेत ही माझ्यादृष्टीने आनंदाची बाब आहे. 

यावर शबाना आझमी यांनी देखील आपली प्रतिक्रीया देत सांगितले की,  "मी खूप आनंदी आहे. मला माहित आहे की रिचर्ड डॉकिन्स जावेदसाठी प्रेरणादायक नायक राहिले आहेत. हा पुरस्कार अधिक महत्त्वाचा आहे कारण आजच्या काळात सर्व धर्मातील धार्मिक कट्टरपंथीयांनी धर्मनिरपेक्षतेवर हल्ला केला आहे." जर हे केले गेले असेल तर हा पुरस्कार धर्मनिरपेक्षतेच्या संरक्षणासाठी जावेदच्या प्रयत्नांना अधिकृत करतो. " हा पुरस्कार जगप्रसिद्ध इंग्रजी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावे देण्यात येतो.

टॅग्स :जावेद अख्तरशबाना आझमी