Join us  

दोनदा नापास झाला अन् एकदिवस नशिबाने कलाटणी घेतली; वाचा, ‘सेक्रेड गेम्स’मधील बंटीची स्ट्रगल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 8:00 AM

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ जगभर लोकप्रिय झाली.  वादग्रस्त कंटेटसोबतच या सीरिजमधील कलाकारांच्या शानदार अभिनयाचीही तितकीच चर्चा झाली. या सीरिजमधील एक चेहरा तर रातोरात चर्चेत आला. होय, हा चेहरा कुणाचा तर बंटीचा.

ठळक मुद्देदिल्लीत एक पार्टटाईम नोकरी करून त्याने एनएसडीत प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. पण तिथेही जतीनला अपयश आले.

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ जगभर लोकप्रिय झाली.  वादग्रस्त कंटेटसोबतच या सीरिजमधील कलाकारांच्या शानदार अभिनयाचीही तितकीच चर्चा झाली. या सीरिजमधील एक चेहरा तर रातोरात चर्चेत आला. होय, हा चेहरा कुणाचा तर बंटीचा. अर्थात अभिनेता जतीन सरना याचा. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये जतीनने साकारलेली बंटीची व्यक्तिरेखा इतकी अफलातून होती की, तो सगळ्यांच्या डोळ्यांत भरला. ही भूमिका जतीनला कशी मिळाली आणि यासाठी त्याला कुठल्या कुठल्या संघर्षातून जावे लागले, हे अलीकडे त्याने सांगितले.

दिल्लीत राहणारा जतीन एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेला. जतीन एका संयुक्त कुटुंबात वाढला. कुटुंबावर लाखोंचे कर्ज होते. अशात जतीनचे शिक्षण सुरु होते. पण नवव्या वर्गाम जतीन फेल झाला. यानंतर ओपन लर्गिंग स्कूलमधून त्याने दहावी केले. पण अकरावीत तो पुन्हा नापास झाला. बारावीचे म्हणाल तर त्याने कसेबसे १२ वी पास केले. घरात पैशांची अडचण होती. घरचे ते वातावरण पाहून जतीनला घरातून पळून जावेसे वाटेल. एकदा एका स्कूल इव्हेंटमध्ये जतीन अक्षय कुमारच्या ‘मोहरा’ गाण्यातील ड्रेसअपमध्ये पोहोचला. त्याला त्या अवतारात पाहून त्याची खूप टिंगल झाली. पण जतीनने ती टिंगल जराही मनावर घेतली नाही. कारण त्याला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे जाते. 

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जतीनने अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनीही त्याला पाठींबा दिला. वडिलांनी जतीनच्या हातावर 5000 रूपये दिले आणि ते घेऊन जतीन मुंबईत आला. पण अ‍ॅक्टिंगचे कुठलेही ट्रेनिंग घेतले नसल्याने त्याला प्रचंड खस्ता खाव्या लागल्या. ज्याच्या भरवशावर तो मुंबई आला होता, त्यानेही साथ सोडली. ट्रेनिंगशिवाय अ‍ॅक्टिंगमध्ये संधी कठीण आहे, हे जतीनला तोपर्यंत कळून चुकले आणि तो पुन्हा दिल्लीला परतला.

दिल्लीत एक पार्टटाईम नोकरी करून त्याने एनएसडीत प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. पण तिथेही जतीनला अपयश आले. यानंतर तो श्रीराम सेंटरमध्ये गेला आणि येथे आपल्या अ‍ॅक्टिंगने त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या ट्रेनिंगने त्याच्यातील आत्मविश्वास वाढला. याकाळात अनेक लहानमोठ्या भूमिका त्याने केला आणि एकदिवस अचानक त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली. अनुराग कश्यपची ‘सेक्रेड गेम्स’  ही सीरिज त्याला मिळाली. या सीरिजने जतीन एका रात्रीत लोकप्रिय झाला.

टॅग्स :सॅक्रेड गेम्स