Join us  

जान्हवी कपूरच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी खुशी कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:11 PM

जान्हवीच्या रिलेशन स्टेटसविषयी तिच्या बहिणीने म्हणजेच खुशी कपूरनेच खुलासा केला आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत खुशी पण आपल्याला दिसत आहे. ती जास्त काही बोलत नसली तरी आपल्या बहिणीला पाठिंबा देताना दिसत आहे. तिने या कार्यक्रमात बहिणीच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी देखील खुलासा केला आहे. ती सांगते, ती एकटी असल्याने ती खूपच चांगली आहे.

आपले आवडते कलाकार कोणाच्या सोबत नात्यात आहे हे जाणून घेण्याची इच्छा नेहमीच त्यांच्या चाहत्यांना असते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात इशान खट्टरसोबत तिची जोडी जमली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्यावेळी मीडियात आल्या होत्या. पण यावर त्या दोघांनी मौन पाळणेच पसंत केले होते. आता जान्हवीच्या रिलेशन स्टेटसविषयी तिच्या बहिणीने म्हणजेच खुशी कपूरनेच खुलासा केला आहे.

नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. नेहा धुपियाच्या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली असून या सेलिब्रेटींनी नेहासोबत आपले अनेक सिक्रेट या कार्यक्रमात शेअर केले आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रचंड धमाल मस्ती देखील केली आहे. नेहाच्या या शोचा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या कार्यक्रमात जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या बहिणी झळकणार आहेत.

नेहाच्या BFFs With Vogue या चॅट शोच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या भागात जान्हवी आणि खुशी झळकणार आहेत. या भागाचा टीझर नेहाने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. यात जान्हवी आणि खुशीची खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

या कार्यक्रमात जान्हवीला इशान खट्टर आणि तारा सुतारिया यांच्या नात्याविषयी विचारण्यात आले. या व्हिडिओत इशान आणि तारा सुतारिया एकमेकांना डेट करत आहेत का आणि या गोष्टीचा तुला काही फरक नाही पडत का असे नेहा जान्हवीला विचारत आहे. त्यावर जान्हवीने सांगितले की, हा एक ट्रिकी प्रश्न आहे. तसेच या व्हिडिओत खुशी पण आपल्याला दिसत आहे. ती जास्त काही बोलत नसली तरी आपल्या बहिणीला पाठिंबा देताना दिसत आहे. तिने या कार्यक्रमात बहिणीच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी देखील खुलासा केला आहे. ती सांगते, ती एकटी असल्याने ती खूपच चांगली आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरखुशी कपूर