Join us

जान्हवी कपूरनं खुल्लमखुल्ला शिखर पहाडियावर व्यक्त केलं प्रेम, बॉयफ्रेंडच्या नावाचं परिधान केलं टीशर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:43 IST

Janhavi Kapoor And Shikhar Pahariya: जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी काही काळ त्यांचे नाते लपवून ठेवले होते पण आता हे जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहे.

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांनी काही काळ त्यांचे नाते लपवून ठेवले होते पण आता हे जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहे. सोशल मीडिया असो, बॉलिवूड पार्ट्या असोत किंवा मंदिरांना भेटी असोत, जान्हवी आणि शिखर नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आता या जोडप्याचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये जान्हवी पुन्हा एकदा शिखरवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

ओरी उर्फ ओरहान अवतरमणीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांचे न पाहिलेले फोटो शेअर केले. त्याच्या रिमध्ये, सोशल मीडिया सेन्सेशनने जान्हवीचे कस्टमाइज्ड टी-शर्ट घातलेले फोटो देखील शेअर केले ज्यावर शिखरचे फोटो छापलेले होते. त्यावर 'शिखर' लिहिले होते. फोटोमध्ये जान्हवी आणि शिखर एकत्र पोज देताना गोंडस दिसत होते.

जान्हवी-शिखरने घेतला ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचा आनंद ११ जुलै रोजी जान्हवी आणि शिखरने लंडनमधील विम्बल्डन येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकेट क्लबमध्ये झालेल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतही हजेरी लावली. ते कार्लोस अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ यांच्यातील सेमीफायनल सामना पाहण्यासाठी देखील गेले होते.

जान्हवी आणि शिखरमधील संबंध कसे आहेत?मिर्ची प्लसला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूरने शिखर पहाडिया यांच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले आणि म्हणाली, "मी १५-१६ वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. मला वाटते की माझी स्वप्ने नेहमीच त्याची स्वप्ने राहिली आहेत आणि त्याची स्वप्ने नेहमीच माझी स्वप्ने राहिली आहेत. आमच्यात खूप जवळीक आहे."

वर्कफ्रंटजान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची 'देवरा: भाग १' मध्ये दिसली होती. आता तिचा परम सुंदरी हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रासोबत प्रदर्शित होणार आहे. ती लवकरच सनी संस्कारच्या 'तुलसी कुमारी'मध्ये वरुण धवनसोबत आणि आरसी १६ मध्ये राम चरणसोबत दिसणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर