Join us  

काय? मोनोकिनीवर जान्हवीने खर्च केले हजारो रुपये?; अभिनेत्रीने स्विमिंग पूलमध्ये दिले किलर एक्स्प्रेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 5:04 PM

Janhvi kapoor: अलिकडेच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये असून खास फोटोसाठी काही पोझ देत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि सिजलिंग फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा जान्हवी व्हेकेशनवर गेल्यानंतर तेथील काही फोटो शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते. सोशल नेटवर्किंगवर अॅक्टीव्ह असणाऱ्या जान्हवीने अलिकडेच मोनोकिनी परिधान करुन स्विमिंगपूलमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यावेळचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरही विशेष म्हणजे यावेळी जान्हवीने परिधान केलेल्या मोनोकिनीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. साधीशी वाटणारी ही मोनोकिनी बरीच महाग असल्याचं सांगण्यात येतं. 

अलिकडेच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये असून खास फोटोसाठी काही पोझ देत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. फोटोमध्ये जान्हवीची मोनोकिनी अत्यंत साधी दिसत आहे. परंतु,ती बरीच महाग असल्याचं सांगण्यात येतं.

जान्हवीने परिधान केलेली मोनोकिनी Ookioh या ब्रँडची आहे.या मोनोकिनीची किंमत $158 म्हणजेच भारतीय चलनानुसार ११ हजार ७५८ रुपये इतकी आहे. दरम्यान, 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी लवकरच 'गुड लक जेरी' आणि 'तख्त' या चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड