Join us  

Roohi Box Office: कोरोना काळात ‘रूही’ची जादू, पहिल्या आठवड्यात कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 4:35 PM

Roohi Box Office: लॉकडाऊननंतर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा ‘रूही’ हा पहिला मोठा सिनेमा होता. साहजिकच हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते.

ठळक मुद्दे‘रूही’  हा सिनेमा 2000 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. हार्दिक मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जान्हवी कपूर, राजकुमार राव व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

जान्हवी कपूरचा ‘रूही’ हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि या सिनेमाच्या कमाईच्या आकड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. होय, कारण लॉकडाऊननंतर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा सिनेमा होता. साहजिकच हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. 11 मार्चला शिवरात्रीच्या दिवशी हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला.   सहा दिवसांत या सिनेमाने 15.19 कोटींची कमाई केली आहे. कोरोना काळात ‘रूही’ची ही कमाई सकारात्मक सुरुवात मानली जात असून यामुळे निर्माते दिग्दर्शक सुखावले आहेत.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 3.06 कोटींचा गल्ला जमवला. यानंतर दुसºया दिवशी 2.25 कोटी कमावले. शनिवारी आणि रविवारी म्हणजेच वीकेंडला ‘रूही’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसांत सिनेमाने अनुक्रमे 3.42 कोटी व 3.85 कोटींचा बिझनेस केला. तर सोमवारी 1.35 कोटी आणि मंगळवारी 1.26 रूपयांची कमाई केली.

‘रूही’  हा सिनेमा 2000 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. हार्दिक मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जान्हवी कपूर, राजकुमार राव व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

अशी आहे चित्रपटाची कथा‘रूही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जिची लग्न सोहळा असणाऱ्या घरांवर नजर आहे. नवरदेव झोपला की, ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.दिनेश विजन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. याआधी राजकुमार व दिशेन विजान या दोघांनी ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

टॅग्स :जान्हवी कपूरराजकुमार रावबॉलिवूड