जाम भडकली सोहा अली खान; म्हणे करिनाशी माझी तुलना करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 11:31 IST
अभिनेत्री सोहा अली खान सध्या आनंदात आहे आणि का नसणार, सोहा आई जी होणार आहे. सोहाच्या बाळाच्या आगमनासाठी संपूर्ण ...
जाम भडकली सोहा अली खान; म्हणे करिनाशी माझी तुलना करू नका!
अभिनेत्री सोहा अली खान सध्या आनंदात आहे आणि का नसणार, सोहा आई जी होणार आहे. सोहाच्या बाळाच्या आगमनासाठी संपूर्ण खान कुटुंब जोरदार तयारीला लागले आहे. पण अलीकडचे म्हणाल तर सोहा प्रचंड भडकलेली आहे. यामागे असे काय कारण आहे, हे तर जाणून घ्यायलाच हवे.सोहाच्या या रागामागचे कारण आहे करिना कपूर. होय, सोहाची वहिणी म्हणजे बेगम करिना कपूर खान अलीकडेच आई झाली, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आपली प्रेग्नंसी करिनाने जाम एन्जॉय केली होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यानचे तिचे स्टाईल स्टेटमेंटही चर्चेचा विषय ठरले होते. आता करिनाची नणंदबाई सोहा प्रेग्नंट आहे, म्हटल्यावर तुलना तर होणारच. नेमकी हीच गोष्ट सोहाला खटकली आहे. करिनाने ज्याप्रमाणे स्वत:ची प्रेग्नंसी हँडल केली होती, सोहानेही तेच करावे, अशी आशा केली जात आहे. पण हे सोहाला काही पचलेले नाही. त्यामुळेच माझी तुलना करिनाशी करू नका, असे तिने तुलना करणाºयांना स्पष्ट शब्दांत बजावले आहे. माझी तुलना करिनाशी केली जावी, हे मला आवडत नाही. प्रत्येकाचा एक अंदाज असतो. प्रत्येकाच्या शारिरीक गरजा वेगवेगळ्या असतात. काहींना पे्रग्नंसीदरम्यान कितीही धावपळ केली तर फरक पडत नाही. याऊलट काहींना आरामाची गरज असते. मला विश्रांतीची गरज आहे, असे वाटले तर मी सगळी कामे बाजूला सारून विश्रांती गेली. तूर्तास प्रेग्नंसी माझी प्रायोरिटी आहे. आणखी काहीही नाही, असे तिने म्हटले आहे.तसे सोहाचेही चूक नाही. प्रत्येकाच्या शारिरीक व मानसिक गरजा, त्याची घडण वेगवेगळी असते. अशात सोहा व करिनाची तुलना होणे योग्य नाहीच. पण शेवटी करिनाची नणंद म्हटल्यावर, ‘इतना तो चलता है ना सोहा’.