Join us  

जॅकी श्रॉफने चाळीतल्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:00 AM

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडच्या सर्वात जबरदस्त अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या बिंधास्त वृत्तीसाठी ओळखले जाते.

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडच्या सर्वात जबरदस्त अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या बिंधास्त वृत्तीसाठी ओळखले जाते. त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्ती त्यांना भिडू म्हणतात. हलाखीच्या दिवसांतून मार्ग काढत यशस्वी होण्याच्या प्रवासाबाबत त्यांना नेहमी अभिमान वाटतो आणि ते सांगण्यासाठी अजिबात लाजत नाहीत.

नुकतीच त्यांनी सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो 'सुपर डान्सर'च्या तिसऱ्या सीझनला भेट दिली. या शोमधील स्पर्धकांचे त्यांच्या सुपरहिट गाण्यांवरील डान्स पाहून आश्चर्यचकीत झाले. एका डान्स दरम्यान, जॅकीला एकदम भरून आले. जेव्हा देहरादूनच्या अकरा वर्षांच्या अक्षत भंडारीला तोंड द्यावे लागणाऱ्या कठोर परिश्रमबदल त्यांनी ऐकले आणि ते ऐकून त्यांनी त्यांची पार्श्वभूमी शेअर केली आहे.  त्यांच्या हलाखीच्या दिवसांबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले, "मी माझ्या आयुष्यातील ३३ वर्षे चाळीमध्ये राहिलो आहे. तिथे केवळ ३० घरे आणि ३ बाथरुम होते. माझी आई माझ्या शाळेच्या फी भरण्यासाठी भांडी आणि साडी विक्री करायची. जिद्दीच्या जोरावर आज मी इथपर्यंत पोहचू शकलो. मी अभिनेता असूनही मी त्या ठिकाणी अजूनही जातो आणि आजही तिथे राहावेसे वाटते. त्या जागेशी मी भावनिकरित्या जोडलो गेलेलो आहे. " बाकीच्या परीक्षकांना त्यांच्या भूतकाळातील आणि त्यांच्यासमोर असलेल्या संघर्षांबद्दल ऐकून भरून आले. पण हे सर्व असूनही, त्याने हसत असे काहीतरी सांगितले जे केवळ जजचाच नव्हे तर सेटवर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श केला. ते म्हणाले, "तभी गम कम था, जब कमरे कम थे."जॅकी श्रॉफ यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आगामी सुपर डान्सरचा एपिसोड नक्की पहा.

टॅग्स :जॅकी श्रॉफसुपर डान्सर