‘जग्गा जासूस’ पुन्हा टांगणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:48 IST
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा ‘जग्गा जासूस’ फार चर्चेत आहे. दोन वर्षांपासून त्याची शूटिंग सुरू असून अद्याप त्याची ...
‘जग्गा जासूस’ पुन्हा टांगणीवर?
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा ‘जग्गा जासूस’ फार चर्चेत आहे. दोन वर्षांपासून त्याची शूटिंग सुरू असून अद्याप त्याची शूटिंग पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी रणबीर-कॅटचा ब्रेकअप झाला त्यामुळेही चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होतोय. आता तर म्हणे पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहण लागले आहे. रणबीर-कॅटच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जूनमध्ये रिलीज होणारा जग्गा जासूस आता जूलै-आॅगस्टच्या दरम्यान रिलीज होणार आहे. कॅट यात जर्नालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.