जॅकलीनचा सोनमला गोड संदेश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 21:22 IST
सोनमची ‘बीएफएफ’ फ्रेंड (बेस्ट फे्रंड फॉरेव्हर) जॅकलीन फर्नांडिसने तिला एक गोड संदेश दिला आहे.
जॅकलीनचा सोनमला गोड संदेश !
बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींचे एकमेकांशी कितीही खटके उडत असतील तरी काही चांगले नातेसंबंध देखील असलेल्या जोड्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याअगोदर ते एकमेकांना बेस्ट विशेस देतात तसेच कौतुकही करतात. सोनम कपूरचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही राज्यात तर त्याला टॅक्स फ्री देखील करण्यात आले आहे. यानिमित्त सोनमची ‘बीएफएफ’ फ्रेंड (बेस्ट फे्रंड फॉरेव्हर) जॅकलीन फर्नांडिसने तिला एक गोड संदेश दिला आहे. कुणाला कशाची भीती वाटते या सोनमच्या कॅम्पेनअंतर्गत जॅकीने देखील हे कॅम्पेन जॉईन केले आहे. त्यात तिने जेट एअरवेजच्या ग्रुपसोबत तिला एक क्युट असा मॅसेज दिला आहे. तिने इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामार्फत तिने तिचा मॅसेज सोनमपर्यंत पोहोचवला आहे. त्यात ती म्हणते,‘ सोनम, तु मला माझ्या मनातील भीतीला दूर करण्यासाठी मदत केली आहेस. थँक यू! अॅण्ड वी लव्ह यू सो मच....! ’