Join us

​जॅकलिनने केला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 10:12 IST

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिझचे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये सामील झाले आहे. जॅकलिनने सुमारे दीड हजार महिलांचे ...

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिझचे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये सामील झाले आहे. जॅकलिनने सुमारे दीड हजार महिलांचे नेतृत्व करताना ६० सेंकदांपर्यंत ‘अ‍ॅबडॉमिनल प्लांक पोझिशन’मध्ये राहून हा विश्वविक्रम कायम केला. मुंबईतील जिओ गार्डनमध्ये ‘डू यू’ कॅम्पेनसाठी जॅकलिनसह कल्की कोच्लिन, आॅलिपिंक पदक विजेती साक्षी मलिक यांनी यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमात १६२३ महिलांनी एकत्र येत ‘अ‍ॅबडॉमिनल प्लांक’ म्हणजेच स्वत:चे शरीर कोपरापासून ते पायाच्या बोटांवर ६० सेकंदापर्यंत स्थिर व संतुलन राखण्याचा जुना विश्वविक्रम मोडला. महिलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वृद्धिंगत व्हावी या दृष्टीकोनातून हा विक्रम रचण्यात आला.  ‘अ‍ॅबडॉमिनल प्लांक’मुळे हाताचे पोटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. महिलांमध्ये आपल्या आरोग्याप्रती जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘डू यू’ कॅम्पनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जॅकलिनने आपल्या फिटनेसचे रहस्य सर्वांना सांगितले. मुलींना बिनधास्त जगण्याचा सल्ला दिला. आजकालच्या मुलींना आपली फिगर सेलिब्रेटीज सारखी हवी असते, यासाठी त्या बरीच मेहनत करतात. विशेष म्हणजे केवळ डायटिंग करून शरीराला त्रास देतात. मात्र, डायटिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहील असे नाही, तर चांगल्या शरीरासाठी व्यायाम करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. शरीर निरोगी राखण्यासाठी व्यायामाला महत्त्व देणे गरजेचे आहे असेही जॅकलिन म्हणाली. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात बॉलिवूड व टीव्ही मालिकांत काम करणाºया अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे केवळ हेल्थ व फिटनेसचा प्रचार करण्यासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने कलाकार एकत्र आले होते. ‘डू यू कॅम्पेन’साठी जॅकलिन मागील काही दिवसांपासून तयारी करीत होती.