जॅकलिन फर्नांडिसने अशाप्रकारे लावले ठुमके, डान्स रिहर्सल व्हिडीओ होतोय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 19:51 IST
सलमान खानसोबत ‘रेस-३’मध्ये जॅकलिनचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती ठुमके लावताना दिसत आहे.
जॅकलिन फर्नांडिसने अशाप्रकारे लावले ठुमके, डान्स रिहर्सल व्हिडीओ होतोय व्हायरल!
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. अशात सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिची चांगलीच प्रशंसा केली जात आहे. चित्रपटाशी संबंधित प्रमोशन असो वा स्वत:च्या अॅक्टिव्हिटी या सर्वांचेच व्हिडीओ बनवून ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करीत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये जॅकलिन डान्स मूव्ज दाखविताना दिसत आहे. वास्तविक ही एक जीआयएफ फाइल आहे. मात्र अशातही थोड्याच व्हिडीओमध्ये तिचे ठुमके चाहत्यांना घायाळ करीत आहेत. जॅकलिनचा हा डान्स प्रॅक्टिस व्हिडीओ आहे. जॅकलिन सध्या तिच्या आगामी ‘रेस-३’च्या प्रमोशनसाठी चित्रपटातील टीम मेंबर्सबरोबर विविध शहरांमध्ये फिरत आहे. शुक्रवारी या चित्रपटाचे तिसरे ‘अल्लाह दुहाई’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मुंबईतील जुहूस्थित पीव्हीआर थिएटरमध्ये हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. ज्याठिकाणी सलमान, जॅकलिनसह अन्य स्टारकास्टही उपस्थित होते. या चित्रपटात सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी यांच्या या चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझाने केले आहे. सलमानचा हा चित्रपट ईदनिमित्त १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जॅकलिनचा व्हिडीओ तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात असून, तिचे कौतुक केले जात आहे.