Join us  

जॅकलिन फर्नांडिसच्या या पारंपरिक लूकने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:51 PM

बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पारंपरिक लूकमध्ये फार कमी दिसते. सध्या तिच्या याच लूकने बॉलिवूडप्रेमींची उत्कंठा वाढली आहे.

बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पारंपरिक लूकमध्ये फार कमी दिसते. सध्या तिच्या याच लूकने बॉलिवूडप्रेमींची उत्कंठा वाढली आहे. तिचा हा नवा अवतार प्रेक्षकांना चकित करणारा आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा उत्कंठता वाढवणारा ठरतोय. विश्वास बसत नसेल तर तिचा हा ताजा फोटो तुम्ही पाहायलाचं हवा.या नव्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये जॅकलिन साडीमध्ये आहे. कमीत कमी मेकअप, ट्रेडमार्क आॅयलाइनर, छोटी गोल बिंदी आणि चेह-याचा भाग पदराने झाकलेला अशा अवतारात ती दिसतेयं. 

जुन्या नट्यांची आठवण करुन देणारा हा तिचा लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. अर्थात तिचा हा नवा अवतार कशासाठी आहे हे रहस्य तिने उलगडलेले नाही. परंतु तिचा हा पारंपरिक लूक तिच्या आगामी चित्रपटातील असावा असा कयास बांधला जातोय.जॅकलिनचे अलीकडेचं प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा २’ आणि ‘रेस३’ या दोन्ही चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. तूर्तास आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल ती काहीही बोललेली नाही. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे.मध्यंतरी ‘भारत’मध्ये कॅटरिना कैफची वर्णी लागल्याने जॅक अपसेट असल्याची बातमी आली होती. सलमान या चित्रपटात आपल्यालाचं संधी मिळेल, अशी पक्की खात्री जॅक बाळगून होती. अलीकडे झालेल्या सलमानच्या वर्ल्ड टूरमध्येही जॅक सहभागी झाली होती. पण सलमानच्या मनात ‘सुंदर सुशील’ कॅट पक्की बसली होती. त्यामुळे प्रियांका आऊट होताच, ‘भारत’मध्ये ताबडतोब कॅटची वर्णी लागली आणि इकडे जॅक हात चोळत बसली.मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस