Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भूत पोलीस'मध्ये ही भूमिका साकारताना दिसणार जॅकलिन फर्नांडिस, पहिल्यांदाच अर्जुन कपूरसोबत करतेय काम

By गीतांजली | Updated: November 10, 2020 13:01 IST

मुंबईत परतल्यावर ती रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या आगामी ‘भूत पोलिस’ सिनेमाच्या शूटिंगसाठी धर्मशालामध्ये आहे. जॅकलिनकडे सध्या 'किक 2', 'सर्कस' आणि 'भूत पोलीस'सारखे बिग बजेट सिनेमा आहे. जॅकलिन या वर्षी धर्मशालामध्ये दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. 

'भूत पोलीस' मधील तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, जॅकलिनने खुलासा केला की ती यात सुपर ग्लॅमरस अवतारा दिसणार आहे. सिनेमाची शूटिंग नुकतीच सुरु झाली आहे.  जॅकलिन तिच्या भूमिकेबाबक फारसे काही सांगितले नाही. जॅकलिन म्हणते तिची भूमिका खूप हटके आहे. 

'भूत पोलिस' सिनेमातील त्याच्या सह-अभिनेत्याबद्दल बोलताना जॅकलिन पुढे म्हणाली, 'सैफ आणि मी रेस 2 मध्ये एकत्र काम केले आहे. आम्ही फक्त सह-कलाकार नसून मित्र आहोत तर अर्जुन आणि यामी ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करत आहे. 

जॅकलिन जवळपास एक महिना धर्मशालामध्ये मुक्काम असणार आहे. मुंबईत परतल्यावर ती रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २००८ साली तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती.

 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसअर्जुन कपूरसैफ अली खान