Join us  

लगीनघाई! रकुल प्रीतच्या नवरदेवाचं घर सजलं, जॅकीच्या घरी विशेष रोषणाई; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:37 AM

रकुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) सध्या चांगलीच चर्चेत आले. रकुल प्रीत सिंग तिच्या चित्रपटांमुळे नाही. तर तिच्या पर्सनल लाइफ आणि लग्नामुळे चर्चेत आले. रकुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. जॅकी भगनानीसोबत (jackky bhagnani) ती लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या महिन्यामध्ये २१ तारखेला गोव्यामध्ये लग्न करणार आहेत. आता दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. रकुल प्रीतच्या नवरदेवाचं घर सजलं आहे.

रकुल आणि जॅकी हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे.  दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचं कळतंय. जॅकी भगनानीच्या घराचा एका व्हिडीओ पिंकव्हिलाने शेअर केला आहे. यात नवरदेवाचं घर लाइटिंगने सजल्याचं दिसून येत आहे. जॅकीच्या मुंबईतील घर हे रोषणाई आकर्षक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. रकुल आणि जॅकी या दोघांच्याही घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या दोघांची लव्हस्टोरी लॉकडाउनमध्ये सुरू झालेली. रकुल आणि जॅकी अनेक वर्षांपासून एकमेकांचे शेजारी होते, मात्र शेजारी राहूनही दोघं एकमेकांना कधीही भेटले नव्हते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीतील प्रेमात रूपांतर झाल आणि आता चाहते या दोघांच्या लग्नासाठी त्यांचे खूपच उत्सुक आहेत.  

टॅग्स :रकुल प्रीत सिंगसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडजॅकी भगनानी