Join us

जॅकी श्रॉफचा खुलासा, ‘टायगरसोबत चित्रपट तर लांबच पण भेटही झाली दुर्लभ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 18:35 IST

अभिनेता टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ...

अभिनेता टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान टायगरने एका वेबसाइटशी बोलताना म्हटले होते की, पापा जॅकी श्रॉफसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. परंतु अद्यापपर्यंत चांगली कथा मिळाली नाही. कथा चांगली मिळाल्यास नक्कीच आम्ही दोघे एकत्र काम करणार. पण यावर आता पापा जॅकी श्रॉफने खुलासा केला असून त्यांनी, ‘चित्रपट तर लांबच पण आमची भेटही दुर्लभ झाल्याचे म्हटले आहे. ‘लोकमत’ सीएनएक्स मस्तीशी बोलताना जॅकीदा यांना, ‘टायगर आणि तुम्ही प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र केव्हा बघावयास मिळणार?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबतचा खुलासा केला. जॅकीदाने म्हटले की, ‘दहा-दहा दिवस आमची भेट होत नाही. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठतो तेव्हा बाबा (टायगर श्रॉफ) जीमसाठी जातो. जेव्हा तो घरी येतो तेव्हा मी कामावर जातो. दोघांचे वेळापत्रक खूप व्यस्त असून, दहा-दहा दिवस आमची समोरासमोर भेट होत नाही. अशात चित्रपट केव्हा करणार?’ दरम्यान, टायगरने त्याच्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘मला पापासोबत काम करायचे आहे. मात्र सध्या त्यांच्यासोबत काम करण्याचा योग जुळून आला नाही. कारण आम्ही दोघे एकत्र काम करणार अशी स्क्रिप्ट मिळाली नाही. चांगली कथा मिळताच आम्ही दोघे एकत्र काम करू. तो दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल’ दरम्यान, आता दोघांचीही परस्पर विरोधी मते समोर आली असल्याने हे दोघे केव्हा एकत्र बघावयास मिळतील, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल.