Join us  

लक्झरी लाइफ सोडून जॅकी श्रॉफसोबत चाळीत राहायला आली होती आयशा, वाचा ही लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 6:38 PM

Jackie Shroff & Ayesha Shroff's Love Story : जॅकी श्रॉफ व आयशा यांची लव्हस्टोरी आहे खूप इंटरेस्टिंग

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही जग्गूदादा चाळीतच राहत होता. इतकंच नाही तर निर्माते टॉयलेटच्या बाहेर स्क्रीप्ट घेऊन जग्गूदादाची वाट पहायचे हे देखील आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. मात्र त्यांची पत्नी आयशा श्रॉफदेखील आलिशान घर सोडून जॅकी श्रॉफसोबत चाळीत रहायला आली होती हे फार कमी लोकांना माहित आहे. 

जॅकी श्रॉफ व आयशा यांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. जॅकी श्रॉफने जेव्हा पहिल्यांदा आयशाला पाहिले होते तेव्हा ती अवघ्या १३ वर्षांची होती आणि शाळेच्या गणवेशात बसमध्ये बसली होती. जॅकी न घाबरता तिच्याजवळ गेले आणि आपल्याबद्दल सर्व काही सांगून टाकले. जॅकी तर पहिल्याच नजरेमध्ये आयशाच्या प्रेमात वेडेपिसे झाले होते. नंतर त्यांची भेट एका रेकॉर्ड शॉपवर झाली.

आयशाला काहीतरी खरेदी करायचे होते आणि जेव्हा जॅकीने तिची मदत करण्यासाठी सांगितले त्यावेळी तिला समजले की तो किती चांगला मुलगा आहे. तेव्हाच आयशाने लग्न केलं तर जॅकी श्रॉफसोबत करायचे मनाशी निश्चित केले. 

सुरूवातीच्या दिवसामध्ये जेव्हा दोघे एकमेकांना डेट करत होते त्यावेळी जॅकी एका चाळीमध्ये राहत होते. तर दुसरीकडे आयशा एका मोठ्या घरातील होती आणि तिची लाईफस्टाइल जॅकीपेक्षा खूप वेगळी होती. दोघांमध्ये कधीच पैशांमुळे वाद झाले नाहीत. जॅकीसोबत आयशा रस्त्यावर फिरत असे. त्याच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असे. 

जॅकीची गर्लफ्रेंड अमेरीकेत राहत होती आणि लवकरच भारतामध्ये परत येऊन त्याच्यासोबत लग्न करणार होती. खूप विचार करून जॅकीने ही सर्व हकीकत आपल्या गर्लफ्रेंडला सांगितली. त्याचबरोबर जॅकीने आयशाला देखील सर्व हकीकत सांगितली. परंतु आयशा तोपर्यंत जॅकीच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती. आयशाच्या सांगण्यावरून जॅकीने त्या मुलीला पत्र लिहिले.

जेव्हा दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आयशाची आई त्यांच्या या निर्णयावर नाराज होती.

तिने आपल्या मुलीला एक लक्झरी लाइफस्टाइल दिली होती मग अशामध्ये आयशाच्या आईला असे वाटत होते की तिच्या मुलीने अशा मुलाशी लग्न करणे ठीक नाही जो एका चाळीमध्ये राहतो.

अखेरीस दोघांच्याही प्रेमाचा विजय झाला आणि ५ जून १९८७ मध्ये दोघेही विवाहबंधनामध्ये अडकले.

लग्नाच्या तीन वर्षानंतर आयशाने टाइगरला जन्म दिला. यानंतर कृष्णा श्रॉफचा जन्म झाला. जॅकी श्रॉफ आपल्या करियरमधील यशामध्ये आयशाचा खूप मोठा वाटा असल्याचे सांगतो.

टॅग्स :जॅकी श्रॉफटायगर श्रॉफकृष्णा श्रॉफ