Join us

जॅकी चॅन दिशामुळे प्रभावित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 11:29 IST

असे होत नाही की, ‘कुंग फु’ लिजेंड जॅकी चॅन आपले दररोज येऊन कौतुक करतो आहे. पण जर त्याला खरंच ...

असे होत नाही की, ‘कुंग फु’ लिजेंड जॅकी चॅन आपले दररोज येऊन कौतुक करतो आहे. पण जर त्याला खरंच कुणाचा अभिनय आवडला तर तो करेलही. अभिनेत्री दिशा पाटणी हिने बॉलीवूडमध्ये पहिला चित्रपट ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये काम केले आहे.चीनमध्ये सध्या जॅकी चॅन ‘कुंग फु योगा’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटणी ही सुद्धा त्याच्यासोबत शूटिंग करत आहे. तिने चॅनला तिच्या अभिनय आणि तिच्या मुव्हमेंट्समुळे प्रभावित करून टाकले आहे.दिशा ही ट्रेन्ड जीमनॅस्ट आणि चित्रपटासाठीही ती अत्यंत योग्यप्रकारे सराव करत आहे. चॅनचे म्हणणे आहे की, तिच्या स्किल्स हॉलीवूडचित्रपटांमध्येही कौतुकास्पदच ठरतील. त्याने तिला एक जॅकेट गिफ्ट केले आहे. ज्यावर त्याचे नाव आहे.