Join us

It's exciting!! ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’चे नवे व्हर्जन येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 13:58 IST

‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत हे गाणे तुफान गाजले होते. आता हेच गाणे अब्बास-मस्तान यांच्या ‘मशीन’मध्ये एका नव्या रूपात दिसणार आहे.

नव्वदच्या दशकातली अनेक लोकप्रीय गाणी अद्यापही आपण विसरू शकलेलो नाहीत. अलीकडे तर या लोकप्रीय गाण्यांच्या रिमेकचा ट्रेंडच आला आहे. जुने आयटम वा सिझलिंग नंबर नव्या रूपात लोकप्रीयही होऊ लागले आहेत. अलीकडे शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मै लैला...’ या गाण्याचा रिमेक दिसला. यानंतर हृतिक रोशनच्या ‘काबील’मध्ये ‘सारा जमाना...’ हे गाणे नव्या रूपात दिसले. तर याच वर्षी आलेल्या ‘ओके जानू’ या चित्रपटात ‘हम्मा हम्मा’ हे गाणे रिक्रिएट केले गेले. आता असेच नव्वदीच्या दशकात अमाप लोकप्रीय झालेले एक गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. होय, हे गाणे आहे, ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत हे गाणे तुफान गाजले होते. आता हेच गाणे अब्बास-मस्तान यांच्या ‘मशीन’मध्ये एका नव्या रूपात दिसणार आहे. या गाण्यावर नव्या दमाचा अभिनेता मुस्तफा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी ही जोडी थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात मुस्तफाच्या डोळ्यांवर  अक्षयसारखेच डार्क ग्लासेस दिसतील. बोस्को या गाण्यात कोरिओग्राफर असेल. आणखी एक विशेष बाब म्हणजे, हे गाणे तयार झाल्यानंतर सर्वप्रथम अक्षयला दाखवले जाणार आहे.‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे मूळ गाणे उदित नारायण यांनी गायले होते. या गाण्याचे नवे व्हर्जनही उदित नारायण हेच गाणार आहेत. फरक एवढाच की यातील गायिका मात्र बदललेली असेल. नव्या व्हर्जनमध्ये कविता कृष्णमूर्ती नाही तर गायिका नेहा कक्कड हिचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ‘मशीन’ हा एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे.ALSO READ : गाणे पुन्हा नव्याने...