झगमगत्या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचा चेहरा खूप महत्त्वाचा असतो. मात्र, एका अभिनेत्रीच्या आयुष्यातील भयानक अपघातामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. ही अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. एकेकाळी महिमाच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचंही खूप कौतुक झाले होते. ती सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिची लोकप्रियता आजही कायम आहे.
महिमा चौधरीने १९९७ साली 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. महिमाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. मात्र एका भयानक अपघातानंतर तिचे फिल्मी करिअर संपले आणि तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
सर्जरीमुळे महिमाला घरातच राहावे लागलेत्यानंतर तिच्या टाक्यांमुळे आणि सर्जरीमुळे तिला घरातच राहावे लागले. ज्यामुळे तिला उन्हामध्ये बाहेर जाण्याची देखील परवानगी नव्हती. तसेच तिची संपूर्ण खोली पूर्णपणे काळ्या पडद्यांनी झाकलेली होती, जेणे करुन सुर्य प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडू नये. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुर्याच्या UV किरणामुळे तिच्या चेहऱ्यावर डाग पडू शकतील, त्यामुळे चट्टे टाळण्यासाठी तिला यूव्ही किरणांपासून दूर राहावे लागले, असे महिमा सांगत होती.२००६ साली महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. २०१३ मध्ये ते दोघे विभक्त झाले. या दोघांना एक मुलगी आहे, जिचे नाव आर्याना आहे.