जमणार का इशान खट्टर अन् जान्हवी कपूरची जोडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 15:09 IST
जान्हवी कपूर आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी अगदी तयार आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. करण जोहरच्या चित्रपटातून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार, ...
जमणार का इशान खट्टर अन् जान्हवी कपूरची जोडी?
जान्हवी कपूर आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी अगदी तयार आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. करण जोहरच्या चित्रपटातून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमीही आपण ऐकली आहे. पण आता श्रीदेवीच्या या लाडक्या लेकीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल एक वेगळीच बातमी आहे. होय, जान्हवी कपूर आणि इशान खट्टर (अहो, शाहीद कपूरचा भाऊ) हे दोघेही शेनली वुडलीच्या ‘फॉल्ट इन अवर स्टार’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसू शकतात, अशी बातमी आहे. शशांक खैतान हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचेही कळतेय. आता या बातमीत किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कारण तूर्तास तरी याबद्दल काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या हॉलिवूडपटाच्या बॉलिवूड रिमेकसाठी अनेक बॉलिवूड जोड्यांची नावे चर्चेत होती. सर्वप्रथम यात दीपिका पादुकोण व सुशांत सिंह राजपूत यांची वर्णी लागणार, अशी बातमी आली. यानंतर आलिया भट्ट आणि आदित्य राय कपूर यां दोघांचे नाव चर्चेत आले. पण आता कदाचित मेकर्सला यासाठी एक फ्रेश जोडी हवी आहे. आता फे्रश जोडी म्हटल्यावर इशान आणि जान्हवी या दोघांपेक्षा कुठलीही जोडी असू शकत नाही. हा चित्रपट या जोडीने साईन केलाच तर इशानचा हा दुसरा सिनेमा असेल. सध्या इशान माजिद माजिदी यांच्या ‘बियॉन्ड दी क्लाऊड्स’ या चित्रपटात बिझी आहे. गेल्या काही दिवसांपासून इशान व जान्हवीच्या अफेअरच्या बातम्याही येत आहेत. कदाचित हे अफेअर नसून या चित्रपटाच्या वर्कशॉपचाही भाग असू शकतो. अर्थात हे सगळे तर्कच.एकंदर काय तर सध्या जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूवरून नुसता गोंधळ दिसतोय. आता खरे काय ते, श्रीदेवीनेच अधिकृतपणे सांगायला हवे.