Join us  

'ठाकरे' बायोपिकसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी नव्हे तर, हा अभिनेता होता पहिली चाॅईस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 9:00 PM

बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित झाला असून  प्रेक्षक आणि समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. सिनेमासाठी नवाजनेही भरपूर मेहनत घेतली आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर साक्षात बाळासाहेब वावरतायत असा भास होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, 'ठाकरे' यांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ही नवाजुद्दीन नव्हे तर  इरफान खान होता. मात्र त्याचवेळी इरफानची तब्येत खराब झाल्यामुळे इरफानच्या जागी नवाजची निवड करण्यात आली होती.

नवाजुद्दीनप्रमाणेच अभिनेत्री अमृता रावसुद्धा मीनाताईंच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री रसिका दुग्गलला विचारण्यात आलं होतं. पण नवाजुद्दीनच्या आधीच्या ‘मंटो’ या  सिनेमात  रसिकाने भूमिका साकारल्याने दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्यातील पती-पत्नीचं प्रेमळ नातंही तितक्याच खूबीने रुपेरी पडद्यावर साकारण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यशस्वी ठरले आहेत. संपूर्ण चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेले बाळासाहेब प्रचंड प्रभावी वाटतात. बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अभिनेत्री अमृता राव हिनेही तिच्या वाट्याला आलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. रुपेरी पडद्यावरील बाळासाहेबांसोबतचे संवाद काळजाला भिडतात तसंच पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेमही दाखवण्यात यशस्वी ठरतात. बाळासाहेब ठाकरे रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर सादर करण्यात संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. अनेक बारीकसारीक गोष्टी उत्तमरित्या मांडत पानसे यांनी आपलं दिग्दर्शक म्हणून कसब दाखवून दिलंय हे मात्र नक्की. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :ठाकरे सिनेमानवाझुद्दीन सिद्दीकीइरफान खान