Join us  

इरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय! चाहत्यांची होणार निराशा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 7:22 PM

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानबद्दल एक ताजी बातमी आहे. खुद्द इरफाननेचं ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. 

बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केला. तथापि पाचव्या किमो सेशनच्या वेळी इरफानची प्रकृती बरीच खालावली होती. इतकी की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानबद्दल आता आणखी एक ताजी बातमी आहे. खुद्द इरफाननेचं ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. होय, आपल्या आजारपणामुळे इरफान Gormint या वेबसीरिजमधून बाहेर पडला आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमच्या या वेबसीरिजमध्ये इरफान मुख्य भूमिकेत होता. या सीरिजचे बहुतांश सीन्स शूट झाले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे इरफानला ही वेबसीरिज सोडावी लागलीय.

 ‘या सिरीजमध्ये काम करुन खूप मज्जा आली. पण् माझ्या प्रकृतीमुळे मी या सिरीजमध्ये काम करु शकणार नाही, हे मला मनावर दगड ठेवून सांगावे लागतेय,’ असे इरफानने म्हटले आहे.

इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ अशा आशयाची ही कविता इरफानने शेअर केली होती. 

टॅग्स :इरफान खान